She-Hulk : Attorney at Law News She-Hulk : Attorney at Law News
मनोरंजन

She-Hulk : Attorney at Law? केव्हा, कुठे पाहू शकता; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी

निर्मात्यांनी हल्कच्या प्रेमकथेला पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे

सकाळ डिजिटल टीम

She-Hulk : Attorney at Law News मार्वल स्टुडिओचे चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आहे. परंतु, आता प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या सुपरस्टार्सचे चित्रपट आणि वेब सिरीज ओटीटीवर (OTT) पाहायला मिळत आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्म डिज्नी प्लस हॉटस्टारवर (Disney Plus Hotstar) Captain America, I am Groot, Moon Knight आणि Ms Marvel सारख्या प्रकल्पांनंतर आता She-Hulk : Attorney at Law पाहायला मिळेल.

हल्कची मार्वल स्टुडिओच्या सर्वांत आवडत्या सुपरहिरोमध्ये गणना केली जाते. थॉरची प्रेमकथा सुरू केल्यानंतर आता निर्मात्यांनी हल्कच्या प्रेमकथेला पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे. मार्वलचे लाखो चाहते या वेब सिरीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यांना याबद्दल सर्व काही जाणून घ्यायचे आहे. त्यामुळे तुम्हीही मार्वलचे चाहते असाल तर जाणून घ्या या मालिकेबद्दलच्या अनेक गोष्टी.

मार्वल स्टुडिओने She-Hulk : Attorney at Law in India च्या रिलीजची तारीख १८ ऑगस्ट २०२२ घोषित केली आहे. ज्या दर्शकांकडे या OTT ॲपची सदस्यता आहे ते गुरुवारी दुपारी १२.३० वाजतापासून Disney Plus Hotstar वर विनामूल्य याचा आनंद घेऊ शकतील. तातियाना मास्लानी या मालिकेत जेनिफर वॉल्टर्स म्हणजेच शी-हल्कची भूमिका साकारत आहे.

सामान्य स्त्री कशी बनली शी-हल्क?

चार्ली कॉक्स, रेने एलिस गोल्ड्सबरी, बेनेडिक्ट, सेगारा आणि जिंजर गोंजागा हे प्रसिद्ध चेहरे या मालिकेत दिसणार आहेत. वेब सिरीजची कथा जेनिफर वॉल्टर्स नावाच्या वकिलाची आहे. जी सुपरहिरोजशी संबंधित कायदेशीर बाबी हाताळते. परंतु, ही वकील शी-हल्क कशी बनली? हे जाणून घेण्यासाठी अजून थोडी वाट पहावी लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Exit Poll: ठाणेसह नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, मिरा-भाईंदर आणि वसई-विरारमध्ये कोण बाजी मारणार? एक्झिट पोलची आकडेवारी समोर

Kolhapur Corporation Exit Poll : सतेज पाटील बालेकिल्ला राखणार का?, कोल्हापुरात कोणाची सत्ता; एक्झिट पोल आला समोर

Akola Election Analysis : अकोला महापालिकेत कुणाला मिळेल ‘लाडक्या बहिणींची’ साथ? भाजपासह राष्ट्रवादी-शिंदेसेनेची प्रतिष्ठा पणाला!

Highway Emergency Helpline : ‘हायवे’वर गाडी बंद पडली, पेट्रोल संपलं चिंता नाही; फक्त एक फोन करा अन् तुमचं काम झालं!

Bangladesh Cricket: खेळाडूंचं बंड, तुफान राडा, तोडफोड अन्...; बांगालेदश प्रीमिअर लीग अनिश्चित काळासाठी स्थगित Video

SCROLL FOR NEXT