sheezan khan and tunisha sharma  Sakal
मनोरंजन

Sheezan Khan: ‘इश्क में मरना अच्छा नहीं लगता...’ तुनिषा शर्माच्या मृत्यूनंतर शीझान खानची ही पोस्ट होतेय व्हायरल

तुनिषा शर्माच्या निधनानंतर काही महिन्यांनी टीव्ही अभिनेता शीझान खानने एक पोस्ट शेअर केली आहे.

Aishwarya Musale

तुरुंगातून सुटल्यानंतर शीजान खान सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. त्याची सहकलाकार आणि एक्स गर्लफ्रेंड तुनिषा शर्मा हिला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप त्याच्यावर होता. अनेक महिने तुरुंगात राहिल्यानंतर गेल्या महिन्यातच त्याची तुरुंगातून सुटका झाली.

दरम्यान, तो आपल्या कौटुंबिक फोटो किंवा कवितांद्वारे सोशल मीडियावर मनातील गोष्ट शेअर करत असतो. अलीकडेच त्याने 'इश्क'वर एक पोस्ट शेअर केली आहे.

शीझान खानने नुकताच स्वतःचा एक फोटो शेअर केला . शीजनने लिहिले की, "इश्क में मरना अच्छा नहीं लगता है... इश्क में जीना है तो बात करो... जमाने से डरना, दूर जाना, टूट जाना इश्क में... हिम्मत हारना अच्छा नहीं लगता... हिम्मत बनना है तो बात करो... हाथ थामो एक बार... नजर मिलाओ तो हमसे... नाराजगी मिटानी है तो बात करो."

यापूर्वी शीझान खानने तुनिषासोबतच्या त्याच्या जुन्या आठवणी शेअर केल्या होत्या. तुनिषा शर्माने 24 डिसेंबर 2022 रोजी 'अली बाबा' शोच्या सेटवर गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

वृत्तांवर विश्वास ठेवला तर तुनिशाने शीजानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर हे पाऊल उचलले. तुनिषाच्या आत्महत्येला शिझान हाच जबाबदार असल्याचा आरोप तिच्या आईने केला होता. त्यानंतर पोलिसांनी शिझान खानला अटक केली होती. तेव्हापासून तो न्यायालयीन कोठडीत होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

Someshwar Election: सोमेश्वरच्या सत्तासंघर्षात ८४.२५ टक्के मतदान! २३ हजार ३९३ सभासदांचा कौल; ८३ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद, आज निकाल

AI Farming: ‘एआय’तंत्राच्या मदतीने थोपविला दुष्काळ!तटबोरगावच्या शेतकऱ्याने वाचवला १५ एकर ऊस, पाण्याचीही बचत

SCROLL FOR NEXT