Shehnaaz Gill Instagram
मनोरंजन

Shehnaaz Gill: दीपिका,आलिया अन् कतरिनाकडून शहनाझला चोरायच्यात 'या' गोष्टी..म्हणाली..

शहनाझ गिलनं 'किसी का भाई किसी की जान' सिनेमाच्या निमित्तानं दिलेल्या मुलाखतीत तिच्या वैयक्तिक तसंच करिअर विषयीच्या अनेक मुद्द्यांवर संवाद साधला.

प्रणाली मोरे

Shehnaaz Gill: बॉलीवूडचा दबंग खान सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' सिनेमातून अनेक नवोदित कलाकार बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहेत. बिग बॉस फेम अभिनेत्री शहनाझ गिल देखील या सिनेमातून बॉलीवूडमध्ये एन्ट्री करतेय.

एका मुलाखतीत शहनाझनं सलमान खानच्या सिनेमात आपल्याला भूमिका कशी मिळाली आणि त्यासंबंधित अनेक मुद्द्यांवर संवाद साधला. याच मुलाखतीत शहनाझनं बॉलीवूडच्या काही स्टार अभिनेत्रींची नावं घेत आपल्याला त्यांच्याकडून काय चोरायला आवडेल याविषयी देखील मजेदार गोष्टी शेअर केल्यात.( Deepika To katrina shehnaaz gill reveals what she would like to steal from which bollywood actress)

शहनाझ गिलनं 'किसी का भाई किसी की जान' सिनेमानिमित्तानं दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की जेव्हा सलमान खानच्या सिनेमात तिला काम करण्याची संधी मिळाली तेव्हा तिनं एकही प्रश्न विचारला नव्हता.ती लगेच एका पायावर तयार झाली होती.

प्रश्न का विचारला नाहीस असं शहनाझला विचारल्यावर ती म्हणाली,''तिला नाही वाटलं की सलमान खानला कोणता प्रश्न विचारायची गरज आहे''. ती फक्त क्युट मुलीच्याच भूमिका करू शकते असा लोकांच्या मनात असलेला भ्रम ती लवकरच दूर करेल असं देखील ती म्हणाली.

शहनाझ गिलला बॉलीवूडच्या अभिनेत्रींकडून काय चोरायला आवडेल तेव्हा ती म्हणाली,''मला कतरिनाचा फिटनेस चोरायला आवडेल''. जेव्हा तिला विचारलं गेलं की विकी कौशलचं नाव का घेतलं नाहीस,तेव्हा शहनाझ म्हणाली,''एक विकी आहे माझ्याकडे..मी तिचा का चोरेन. जगात एवढी अविवाहित मुलं आहे मी त्यांच्यापैकी एकाचा विचार करेन''.

शहनाझ गिल म्हणाली ,''तिला कियारा अडवाणी कडून काही चोरावसं वाटलं असतं तर तिनं तिच्याकडून कबीर सिंगमधील तिची भूमिका चोरली असती. शहनाझ म्हणाली,''ती त्या भूमिकेत खूप क्यूट दिसली असती''.

शहनाझ गिल पुढे म्हणाली की, आलिया भट्टकडून तिचा अभिनय तर दीपिका पदूकोणकडनं तिचं सेक्स अपील चोरायला तिला आवडेल.

शहनाझ म्हणाली की,'' दीपिकाला फोटोशूट दरम्यान किंवा असं साधं देखील पाहिलं तरी ती सेक्सी दिसते. तिचा एक वेगळाच औरा आहे''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asha Bhosle Passes Away: दिग्गज गायिका आशा भोसले यांचं निधन! भारतीय संगीत क्षेत्रातील एक अजरामर आवाज हरपला

ASHA BHOSLE PASSES AWAY: बालपणीचा गोड क्षण, आशा भोसले आणि लता मंगेशकरांचा यांचा जुने फोटो Viral

Hormuz Strait: करार नाही, तणाव कायम… तरी होर्मुझमधून GOOD NEWS! जे घडलं ते जगाला थक्क करून गेलं! १६ जहाजांची धडाकेबाज एंट्री

Asha Bhosale: वयाच्या १० व्या वर्षी करिअरची सुरूवात ते २० भाषांत १२००० गाणी, गिनीज बुक मध्ये नोंद; 'असा' आहे आशाताईंचा संर्घषमयी जीवनप्रवास

Induction Safety Tips : इंडक्शन स्टोव्हजवळ अजिबात ठेऊ नका 'या' 5 वस्तू; नाहीतर लगेच होतील खराब, इंडक्शनही जळेल

SCROLL FOR NEXT