Shehnaaz Gill father Santokh Singh  esakal
मनोरंजन

Shehnaaz Gill : अभिनेत्री शहनाज गिलचे वडील संतोख सिंह पंजाब पोलिसांच्या रडारवर, काय आहे कारण?

प्रसिद्ध अभिनेत्री शहनाज गिल (Shehnaaz Gill) ही आता तिच्या वडीलांमुळे चर्चेत आली आहे. पंजाब पोलिसांनी त्यांच्याबाबत कडक भूमिका घेतली आहे.

युगंधर ताजणे

Shehnaaz Gill father Santokh Singh Sukh : टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेत्री शहनाज गिल ही आता वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आल्याचे दिसून आले आहे. शहनाजचे वडील संतोख सिंह सुख यांच्या विरोधात पोलिसांनी गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. त्यामुळे ते चर्चेत आले आहेत.

काही दिवसांपूर्वी अशी बातमी समोर आली होती की, शहनाजचे वडील संतोख सिंह यांच्याकडे (Shehnaaz Gill News) ५० लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. पैसे न दिल्यानं त्यांना जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी त्यांना पोलिसांकडून सुरक्षा मिळावी अशी मागणी केली होती. आता पोलिसांनी संतोख यांनी त्या सुरक्षेचा गैरवापर केल्याचे म्हटले आहे.

बातमी अशी होती की, संतोख यांना एका पाकिस्तानी नंबरवरुन फोन आला होता. त्यात (Shehnaaz Gill Latest News) त्यांच्याकडे पैशांची मागणी करण्यात आली होती. फोनवरुन त्या व्यक्तीनं त्यांच्याकडे ५० लाखांची मागणी केली होती. आता पोलिसांनी हा सगळा प्रकार खोटा असल्याचे म्हटले आहे. संतोख यांनी सुरक्षा व्यवस्थेचा गैरवापर केल्याचे म्हटले आहे.

बाबा बकालाचे पोलीस उपअधीक्षक सुरिंदर पाल सिंह यांनी म्हटले आहे की, एक संस्था चालविण्यासाठी संतोख सिंह यांनी त्यांनी दिल्या गेलेल्या सुरक्षा व्यवस्थेचा दुरुपयोग केला होता.

जसं पोलिसांनी त्यांच्याकडून स्टेटमेंट जाहीर केले त्यानंतर शहनाजच्या वडिलांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. पोलिसांनीच आपल्यावर खोटे आरोप लावले असून त्यामुळे आपल्याला मानसिक त्रास झाल्याचे म्हटले आहे. त्याचे कारण म्हणजे, मला धमकी देणाऱ्यांच्या विरोधात कारवाई न करण्याबद्दल पोलीस ठाण्यामध्ये बोलावून घेतले होते.

संतोथ सिंह यांनी या आरोपाचे खंडन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, पोलिसांनी अजुनपर्यत कोणतीही कारवाई केलेली नाही. पोलिसांनी त्यांची चूक लपविण्यासाठी माझ्यावर खोटे आरोप केले आहेत. या सगळ्यात शहनाज गिलकडून कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL 1st Test: गौतम गंभीरने खेळपट्टीची पाहणी केली, पाठ वळताच क्युरेटरने 'खेळी' खेळली; कॅप्टन, कोचने एकवटले... माईंड गेम

शूटिंगदरम्यान ज्युनिअर एनटीआरला झालेली गंभीर दुखापत; खांद्यावर झाली शस्त्रक्रिया, आता 2 ते 3 महिन्यांचा घेणार ब्रेक

IND vs SL: शुभमन गिल-रिषभ पंत श्रीलंकेत धुमाकूळ घालणार? WTC मध्ये आजपर्यंत कोणालाही न जमलेला पराक्रम करण्याची संधी

Latest Marathi News Live Update : तुम्ही मला अस्पृश्यासारखी वागणूक देता, 'शुद्धीकरण' करता आणि माझा अपमान करता."- खर्गे राज्यसभेत संतापले

‘Gift a Life After Life’! अवयवदानासाठी ५०० विद्यार्थ्यांचा पुढाकार; ‘Tree Of Life’मधून दिला जीवनाचा संदेश

SCROLL FOR NEXT