Shehnaaz Gill Instagram
मनोरंजन

Salman Khan नं जेव्हा शहनाझ गिलला केलेला फोन,अभिनेत्रीनं नंबर केलेला ब्लॉक, समोर आला हैराण करणारा खुलासा..

'किसी का भाई किसी की जान' सिनेमाच्या ट्रेलर लॉंचच्या वेळी शहनाझ गिलनं अनेक किस्से शेअर केले आहेत.

प्रणाली मोरे

Shehnaaz Gill: बॉलीवूड सुपरस्टार सलमान खान सध्या त्याच्या आगामी 'किसी का भाई ,किसी का जान' सिनेमाच्या प्रमोशन मध्ये बिझी आहे. त्याचा हा सिनेमा २१ एप्रिल रोजी सिनेमागृहात रिलीज होत आहे. या सिनेमात बिग बॉस फेम शहनाझ गिल देखील आहे. या सिनेमाच्या रिलीज आधी शहनाझनं एक मोठा खुलासा केला आहे.

तिनं सांगितलं आहे की जेव्हा या सिनेमासाठी सलमान खानचा कॉल आला होता तेव्हा तिनं सलमान खानचा नंबर ब्लॉक केला होता. आता तिनं यामागाच्या कारणाचा खुलासा केला आहे. (Shehnaaz Gill reveals blocked salman khan number called offer kisi ka bhai kisi ki jaan)

'कपिल शर्मा शो' मध्ये बातचीत करताना शहनाझ गिलनं सांगितलं की जेव्हा तिला सलमान खानचा कॉल आला होता तेव्हा ती अमृतसरमध्ये होती. कॉल अपरिचित नंबरवरनं आला होता आणि ती निवांत क्षण एन्जॉय करत असल्यामुळे तिला तेव्हा त्या निवांतपणात कोणताच व्यत्यय नको हवा होता. म्हणून तिनं चक्क सलमान खानचा नंबर ब्लॉक केला होता.

त्यानंतर तिला कळालं की ज्या नंबरवरनं कॉल आला होता तो दुसरा-तिसरा कोणाचा कॉल नाही तर तिच्या लाडक्या सलमान खानचा कॉल होता.

शहनाझनं सांगितलं की थोड्यावेळानं एक कॉल पुन्हा आला आणि मला सांगण्यात आलं की सलमान खान तिला कॉल करण्याचा प्रयत्न करतायत. त्यानंतर शहनाझनं ट्रू कॉलरवर नंबर व्हेरिफाय करून पाहिला तेव्हा कळालं की तो नंबर सलमान खानचा होता.

त्यानंतर शहनाझ गिलला आपली चूक कळाली आणि मग तिनं पुन्हा सलमान खानचा नंबर अनब्लॉक केला. आणि मग सलमान खानला कॉल बॅक केला,सॉरी म्हटलं आणि त्यानंतर शहनाझला 'किसी का भाई,किसी की जान' सिनेमात काम मिळालं.

सलमानचे बहुतेक सिनेमे ईदच्या दिवशी रिलीज होतात. पण यावेळी किसी का भाई,किसी की जान सिनेमा ईदच्या थोडं आधीच रिलीज केला जाणार आहे, सिनेमाचं दिग्दर्शन फरहाद शामजीचं आहे. या सिनेमात सलमानसोबत पूजा हेगडे पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. याव्यतिरिक्त दग्गुबाती व्यंकटेश,सिद्धार्थ निगम,रामचरण,शहनाझ गिल आणि पलक तिवारी देखील या सिनेमात दिसणार आहेत. सध्या या सिनेमाविषयी जोरदार चर्चा सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT