siddharth shukla, shehnaz gill 
मनोरंजन

सिद्धार्थच्या निधनानंतर शहनाज पहिल्यांदाच व्यक्त, "एखाद्यावर प्रेम करतो तेव्हा.."

सिद्धार्थच्या निधनानंतर शहनाज पूर्णपणे खचली होती.

स्वाती वेमूल

सिद्धार्थच्या निधनानंतर शहनाज पूर्णपणे खचली होती.

प्रियकर सिद्धार्थ शुक्लाच्या Sidharth Shukla निधनानंतर अभिनेत्री शहनाज गिल Shehnaaz Gill कामावर परतली आहे. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने सिद्धार्थचे सप्टेंबरमध्ये निधन झाले. त्याच्या निधनानंतर शहनाज पूर्णपणे खचली होती. काही काळ तिने कामातून ब्रेक घेतला होता. मात्र आता तिच्या आगामी पंजाबी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जवळ आल्याने तिला प्रमोशनसाठी उपस्थित असणं गरजेचं आहे. दिलजित दोसांज आणि सोनम बाजवा यांच्या 'होंसला रख' या चित्रपटात शहनाज महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत शहनाज प्रेमाबद्दल आणि तिच्या भावनांबद्दल व्यक्त झाली.

'बॉलिवूड बबल'ला दिलेल्या मुलाखतीत शहनाज म्हणाली, "आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीवर प्रेम करतो, त्याच्यासोबत ज्या भावना जोडल्या जातात, ते लक्षात घेऊन मी ही भूमिका साकारली आहे. आईचं प्रेम हे आईलाच ठाऊक असतं. मी ते प्रेम अनुभवू शकले आणि भूमिकेत उतरवू शकले. कारण माझी आईसुद्धा माझ्यावर खूप प्रेम करते." या चित्रपटात शहनात आईची भूमिका साकारताना दिसणार आहे. 'होंसला रख' हा चित्रपट येत्या १५ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

'बिग बॉस'च्या घरात सिद्धार्थ आणि शहनाज या दोघांमध्ये चांगली मैत्री झाली होती. सिद्धार्थ आणि शहनाज यांच्या मैत्रीची सतत सोशल मीडियावर चर्चा होत असे. 'सिदनाज' असा हॅशटॅग या दोघांनी तयार केला होता. सिद्धार्थ-शहनाजच्या चाहत्यांमध्ये #sidnazz हा हॅशटॅग प्रसिद्ध आहे. सिद्धार्थने मॉडेल म्हणून करिअरची सुरुवात केली होती. 'बाबुल का आंगन छुटे ना' या मालिकेतून त्याने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. त्यानंतर 'जाने पहचाने से.. ये अजनबी', 'लव्ह यू जिंदगी' यांसारख्या मालिकांमध्ये त्याने भूमिका साकारल्या होत्या. मात्र 'बालिका वधू' या मालिकेतील भूमिकेमुळे तो घराघरात पोहोचला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra ATS Raids : पाकिस्तानी गुंडांशी सोशल मीडिया कनेक्शन! कोल्हापूरच्या 2 तरुणांची 10 तास कसून चौकशी; 'एटीएस'कडून राज्यभरात 112 तरुणांची झाडाझडती

Paithan: संत एकनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यात पहिले रिंगण उत्साहात; मिडसांगवीत भक्तिमय वातावरण

Datia Bypoll BJP Crisis : भाजपने माजी गृहमंत्र्यांचे तिकीट कापले, नाराज कार्यकर्त्यांकडून शहरात जाळपोळ, महामार्ग रोखला; पोलिसांवरही दगडफेक

Rameshbhai Kacholia Passes Away : हजारो सामाजिक संस्थांचा आधारवड हरपला, रमेशभाई गुलाबचंद कचोलिया यांचे मुंबईत निधन

Solapur: मोफत वधू-वर सूचक सेवेतून 3 हजारांहून अधिक संसारांना नवी दिशा; इरण्णा पनशेट्टी यांचे समाजसेवेचे प्रेरणादायी कार्य

SCROLL FOR NEXT