(Photo: Sidharth Shukla, Shehnaaz Gill/instagram)
मनोरंजन

सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर समोर आला शहनाजचा व्हिडीओ

'सिदनाझ'चे चाहते कमेंट्स करत तिला खंबीर राहण्याचा सल्ला देत आहेत.

स्वाती वेमूल

प्रसिद्ध टीव्ही अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने Sidharth Shukla २ सप्टेंबर रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. सिद्धार्थच्या निधनाने संपूर्ण कलाविश्वाला मोठा धक्का बसला. सिद्धार्थची मैत्रीण शहनाज गिल Shehnaaz Gill अजूनही त्याच्या मृत्यूच्या धक्क्यातून सावरली नाही. 'सिदनाझ'चे चाहते तिच्याविषयी काळजी व्यक्त करताना दिसतात. अशातच आता पहिल्यांदाच सिद्धार्थच्या निधनानंतर शहनाजचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शहनाजच्या चेहऱ्यावरील दु:ख सहज पहायला मिळत आहे. ती यात एक पंजाबी गाणं गाताना दिसतेय.

व्हिडिओमध्ये 'सिदनाझ'चे चाहते कमेंट्स करत तिला खंबीर राहण्याचा सल्ला देत आहेत. शहनाजचा हा व्हिडीओ नेमका कधीचा आहे हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. पण हा व्हिडीओ सिद्धार्थच्या निधनानंतरचा असल्याचा अंदाज चाहते व्यक्त करत आहेत. सिद्धार्थच्या निधनानंतर शहनाज पूर्णपणे खचली होती.

अनेक मालिका आणि रिअॅलिटी शोजच्या माध्यमातून सिद्धार्थ प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. 'बिग बॉस १३'मध्ये सिद्धार्थने भाग घेतला होता आणि या सिझनचा तो विजेता ठरला होता. या सिझनमध्ये अभिनेत्री व गायिका शहनाज गिलसोबत सिद्धार्थची चांगली मैत्री झाली होती. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर या दोघांनी विविध कार्यक्रमांना एकत्र हजेरी लावली होती. दोघांचा म्युझिक व्हिडीओसुद्धा प्रदर्शित झाला होता. सिद्धार्थ आणि शहनाज यांच्या मैत्रीची सतत सोशल मीडियावर चर्चा होत असे. 'सिदनाज' असा हॅशटॅग या दोघांच्या चाहत्यांनी तयार केला होता. सिद्धार्थ-शहनाजच्या चाहत्यांमध्ये #sidnazz हा हॅशटॅग प्रसिद्ध आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Job: एकाच पदासाठी वेगवेगळ्या परीक्षा नको, शुल्कही वाचणार! मंत्री शेलार यांची विधानसभेत माहिती

Mobile App to Predict Cancer Risk: कर्करोगाचा अंदाज आता मोबाईलवर! टाटा रुग्णालयातील संशोधकांची निर्मिती; जोखमीचे मूल्यांकन शक्य

Pune University flyover: पुण्यातील विद्यापीठ चौकाच्या उड्डाणपुलावरुन जाताना उडतोय गोंधळ; अर्धवट कामामुळे अपघाताचा धोका

उन्हाचा तडाखा वाढला! दिवसभरात प्या ४ लिटर पाणी, जिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्ष, नागरिकांनी लहान मुलांची, ज्येष्ठांची कशी घ्यावी काळजी? वाचा...

Akola News : टी-२० विजयाच्या जल्लोषानंतर अकोल्यात तणाव; दोन गटात वादः वाहनांची तोडफोड, दगडफेकीत नुकसान

SCROLL FOR NEXT