Shehnaz Gill esakal
मनोरंजन

Shehnaz Gill: पाकिस्तानी वेबसाईटवर 'शहनाज गिल'! काय आहे प्रकरण?

टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध सेलिब्रेटी शहनाज गिल काही दिवसांपासून सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे.

युगंधर ताजणे

Tv Actress Shehnaz Gill: टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध सेलिब्रेटी शहनाज गिल काही दिवसांपासून सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे. शहनाजची लोकप्रियता ही दिवसेंदिवस वाढताना दिसतेय. वेगवेगळ्या टीव्ही (social media viral news) मालिका, बिग बॉससारखा रियॅलिटी शो यामुळे तिच्या फॅन फॉलोअर्समध्येही तिच्या भूमिकेनं प्रेक्षकांची पसंती तिनं मिळवली आहे. शहनाजची लोकप्रियता एवढी वाढली की ती आता चक्क पाकिस्तानच्या काही (pakistani actress) न्युज वेबसाईटवर दिसत आहे. त्यामुळे एकीकडे तिच्यावर कौतूकाचा वर्षाव होतोय तर दुसरीकडे तिला नेटकऱ्यांच्या टीकेच्या सामनाही करावा लागत आहे.

केवळ भारतातच नाहीतर जगभरात तिचे चाहते आहेत हे यावरुन दिसून आले आहे. नेटकऱ्यांनी तिचे पाकिस्तानच्या एका वेबसाईटवर आलेले फोटो आणि व्हिडिओ पाहून आश्चर्य व्यक्त केले आहे. असे काय झाले की ती चक्क पाकिस्तानमधील काही मनोरंजन विषयक बातम्या देणाऱ्या वेबसाईटवर तिची झलक पाहिल्यानं अनेकांना धक्का बसला आहे. त्याचं झालं असं की, काही दिवसांपूर्वी शहनाजचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामध्ये शहनाज ही पापाराझ्झींना असं सांगत होती की, मला आता फोटोग्राफर्ससाठी हजार रुपये देऊन स्ट्रेटनिंग करुन घ्यावे लागते. तिचा तो अंदाज शेजारच्या देशातही व्हायरल झाला आहे. त्यामुळे तिला वेगवेगळ्या प्रतिक्रियांना सामोरं जावं लागलं आहे.

शहनाजच्या त्या व्हिडिओला पाकिस्तानी अभिनेत्री याशमा गिलनं देखील तिचं कौतूक केलं आहे. बिग बॉसमधून आपल्या अनोख्या अंदाजानं शहनाजनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. तेव्हापासून ती नेहमीच चाहत्यांच्या चर्चेचा विषय राहिली आहे. दोन दिवसांपूर्वी शहनाज तिचा मित्र सिद्धार्थ शुक्लावरुन ट्रोल झाली होती. त्याच्या पहिल्या पुण्यस्मरणाला ती गैरहजर राहिल्यानं नेटकऱ्यांनी तिला धारेवर धरले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

Supreme Court March : राहुल गांधींनी व्हिडिओ शेअर करत दिली देशवासियांना 'चलो दिल्ली'ची हाक; सरन्यायाधीशांकडे दाद मागणार

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

Mumbai Protest: मुंबईत वातावरण तापलं, ठाकरे कुटुंब पोलीस स्थानकात; व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT