kartik aaryan Shehzada Trailor  Sakal
मनोरंजन

Shehzada Trailor: "फॅमिली पर आए तो डिस्कशन नहीं अ‍ॅक्शन करते हैं"...कार्तिकच्या 'शहजादा'चा ट्रेलर रिलीज

शहजादाच्या ट्रेलरमध्ये कार्तिक दमदार अ‍ॅक्शन करताना दिसत आहे. हा चित्रपट रोहित धवनने दिग्दर्शित केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

कार्तिक आर्यनचा मोस्ट अवेटेड चित्रपट शहजादाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. यामध्ये क्रिती सेनन आणि मनीषा कोईराला देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत.

ट्रेलरमध्ये कार्तिक दमदार अ‍ॅक्शन करताना दिसत आहे. हा चित्रपट रोहित धवनने दिग्दर्शित केला आहे. 'शेहजादा' हा अल्लू अर्जुनच्या 'आला वैकुंठपुरमुलू'चा अधिकृत हिंदी रिमेक आहे.

कार्तिक आणि क्रिती सेनॉनचा 'शेहजादा' हा संपूर्ण अॅक्शन चित्रपट आहे. ट्रेलरच्या सुरुवातीला कार्तिकच्या आवाजात अ‍ॅक्शनसह एक डायलॉग ऐकायला मिळतो, "फैमिली पर आए तो डिस्कशन नहीं करते हैं अ‍ॅक्शन करते हैं."

यानंतर परेश रावल कार्तिक आर्यनच्या वडिलांच्या भूमिकेत दिसतो, जो म्हणतो की तुला बाऊन्सर व्हायचे आहे की वकील कार्तिक म्हणतो दोन्ही. दोघांची एकमेकांसोबतची केमिस्ट्री लोकांना खूप आवडत आहे.

रोहित धवन दिग्दर्शित 'शेहजादा' हा अल्लू अर्जुन स्टारर तेलुगू ब्लॉकबस्टर चित्रपट 'अला वैकुंठापुररामुलू'चा अधिकृत रिमेक आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यन आणि क्रिती सेनन व्यतिरिक्त मनीषा कोईराला देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

त्याच वेळी, 'शेहजादा' हा चित्रपट 10 फेब्रुवारी 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. ट्रेलर रिलीज होण्यापूर्वी कार्तिकने इन्स्टा वर एक फोटोही शेअर केला होता. फोटोत तो चित्रपटाच्या आणि ट्रेलरच्या यशासाठी हात जोडून प्रार्थना करताना दिसत आहे.

'शहजादा'च्या निर्मात्यांनी चित्रपटाचा ट्रेलर लाँच भव्य करण्यासाठी विशेष तयारी केली आहे. 'शहजादा'च्या ट्रेलर रिलीजच्या निमित्ताने तीन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

ज्याची सुरुवात 12 जानेवारीला मुंबईत ट्रेलर लाँचने झाली आहे. यानंतर 13 जानेवारीला 'शहजादा'ची स्टार कास्ट कार्तिक आर्यन आणि क्रिती सेनॉन जालंधरमध्ये लोहरी साजरी करण्यासोबतच चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करणार आहे.

अखेर 14 जानेवारीला मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर कच्छमध्ये 'शेहजादा'चा ट्रेलर रिलीज होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Farmer Protest: कांद्याला भाव नाही, शेतकरी आक्रमक! पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना घेतलं ताब्यात, चांदवडमध्ये रस्त्यावर रणकंदन

Kolhapur VIP Service: कोल्हापूरसह परराज्यातील तरुणींकडून व्हिआयपी सर्व्हिस, म्हैसाळमधील आलिशान बारवर छापा; नशेत धुंद तरुणांना घेतलं ताब्यात

Supreme Court Dowry Harassment Ruling : सासरच्यांनी सुनेला जुळवून घेण्यास सांगितल्यास गुन्हा दाखल होणार? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा आदेश

Mumbai: तिसऱ्या मुंबईला ग्रीनफिल्डचा बुस्टर, नवी मुंबई ते पुणे नव्या एक्सप्रेसवेचा मोठा लाभ होणार; काय आहे प्रकल्प ?

Ichalkaranji IPL Betting : ऑनलाईन ‘आयपीएल’ सट्टेबाजी, झटपट पैशाचा नाद इचलकरंजीतील तरूणांचा कारनामा, ५८ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT