sher shivraj contest sakal
मनोरंजन

'शेर शिवराज'च्या कलाकारांना भेटण्याची सुवर्णसंधी, दिग्पालने दिली ऑफर..

बहुचर्चित 'शेर शिवराज' या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा लवकरच पार पडणार असून त्यात सहभागी होण्यासाठी एक भन्नाट ऑफर दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर याने दिली आहे.

नीलेश अडसूळ

Digpal lanjekar : सध्या ऐतिहासिक चित्रपटांचे वारे जोरात वाहत आहेत. त्यातही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील आणि स्वराज्यासाठी धारातीर्थी पडलेल्या मावळ्यांची संघर्षगाथा दाखवण्याकडे अनेकांचा कल आहे. लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर याने काही वर्षांपूर्वी शिवचरित्रावर आठ चित्रपटांची मालिका अष्टक करणार असल्याची घोषणा केली होती. सध्या त्यातले तीन चित्रपट प्रदर्शित झाले असून चौथे पुष्प लवकरच प्रेक्षक भेटीसाठी सज्ज झाला आहे.

‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’ नंतर आता लवकरच त्यांचा आणखी एक ऐतिहासिक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाला आहे. ‘शेर शिवराज’ असे या चित्रपटाचे नाव असून या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. त्यानंतर 'येळकोट देवाचा' हे गाणे देखील प्रदर्शित झाले. या गाण्याला प्रचंड लोकप्रियता मिळत आहे. लवकरच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

विशेष म्हणजे या ट्रेलर लाँच सोहळ्यात सहभागी प्रेक्षकांनाही सहभागी होता येणार आहे. पण त्यासाठी प्रेक्षकांना थोडी मेहनत घ्यावी लागणार आहे. त्यासाठी दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर याने एक स्पर्धा आयोजित केली आहे. त्यासंदर्भात सविस्तर माहिती दिग्पालने आपल्या सोशल मिडिया अकाउंटवर दिली आहे.

या पोस्टमध्ये लिहिले आहे की,... ‘शेर शिवराज’ ट्रेलरची वाट पाहत होता ना, आता थेट ट्रेलर लॉन्च इव्हेंटला येण्याचीच तयारी करा! #SherShivrajContest मध्ये सहभागी होण्यासाठी ही पोस्ट नीट वाचा. तुमच्या एंट्रीजची आम्ही वाट पाहतोय, अशी पोस्ट दिग्पाल लांजेकर यांनी शेअर केली आहे. तर ही स्पर्धा नेमकी कशी असेल? यात सहभाग नोंदवण्यासाठी प्रेक्षकांना काय करावे लागेल? याबाबत सर्व माहिती देणारीही एक पोस्ट त्याने केली आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी प्रेक्षकांना चित्रपटाचे पोस्टर डाउनलोड करुन आपल्या सोशल मिडिया अकाउंटवर शेअर करायचा आहे. सोबच शेर शिवराज हा चित्रपट पाहण्याची पाच कारणे कॅप्शनमध्ये द्यायची आहेत. सोबत @shershivrajfilm ला टॅग करुन #SherShivrajContest #SherShivrajTrailer हे हॅशटॅग वापरायचे आहेत. ते नसल्यास एन्ट्री ग्राह्या धरली जाणार नाही.

या स्पर्धेतून निवडलेल्या जवळपास ५० हून अधिक भाग्यवंतांना शेर शिवराज या ट्रेलर लाँच सोहळ्यात सहभागी होता येणार आहे. येत्या ११ एप्रिल २०२२ ला हा ट्रेलर लाँच सोहळा होणार असून २२ एप्रिला रोजी चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA: भारतीय गोलंदाजांचा अचूक मारा अन् द. आफ्रिका ७५ धावांच्या आतच गारद! पहिल्या T20I सामन्यात टीम इंडियाचा दणदणीत विजय

Tourist Falls Into Gorge Viral Video : पर्वतावरचा थरार! सेल्फी घेताना पाय सटकून दरीत पडला पर्यटक, तरीही कसा वाचला?

Scholarship Exam 2026: शिष्यवृत्ती परीक्षा २०२६; इयत्ता ५वी-८वी अर्ज भरण्यास १५ डिसेंबरपर्यंत मोठी मुदतवाढ!

Sleep Drunkenness: डोळे उघडतात… पण मेंदू जागा होत नाही! तुम्हाला असू शकतो ‘स्लीप ड्रंकननेस’; जाणून घ्या कारणं आणि उपाय

Indigo: इंडिगोच्या सीईओंना थेट मंत्रालयातून बोलावणं; पीटर एल्बर्स यांनी मंत्र्यांसमोर हातच जोडले, फोटो व्हायरल

SCROLL FOR NEXT