Sherlyn Chopra Targets Salman after rakhi sawant Google
मनोरंजन

Rakhi Sawant नंतर आता शर्लिन चोप्रानं टार्गेट केलं सलमान खानला, खिल्ली उडवत म्हणाली...

आपले आक्षेपार्ह व्हिडीओ शेअर केल्या प्रकरणी शर्लिननं राखीला अटक करुन दिल्यानंतर प्रसारमाध्यमांशी सलमान खान संबधितही काही वक्तव्य केली आहेत.

प्रणाली मोरे

Rakhi Sawant: ड्रामा क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राखी सावंतने मॉडेल व अभिनेत्री शर्लिन चोप्राचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी तिला काल पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. राखीची पोलीस ठाण्यात अनेक तास चौकशी करण्यात आली, त्यानंतर तिला आंबोली पोलीस ठाण्यातून रात्री उशीरा सोडण्यात आलं. पण आता शर्लिन चोप्राने राखी सावंत बरोबर बॉलिवूडचा भाईजान सलमान खानची देखील खिल्ली उडविली आहे.(Sherlyn Chopra Targets Salman after rakhi sawant)

राखी सावंतने तिची बदनामी करण्यासाठी असभ्यतेचा वापर केल्याचा आरोप करत शर्लिननं पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर राखी सावंतला गुरुवारी अटक करण्यात आली. राखी सावंतच्या अटकेनंतर शर्लिन चोप्रा आंबोली पोलिस ठाण्याच्या बाहेर दिसली. शर्लिनने सलमान खानची देखील खिल्ली उडवली, जो नेहमी गरजेच्या वेळी राखीला मदत करण्यासाठी पुढे येतो.

'कोणीही कायद्याच्या वर नाही', असे तिने माध्यमांशी बोलताना सांगितले. सलमान खानची खिल्ली उडवत ती म्हणाली, 'राखी सावंतचा भाऊ सलमाननं देखील हे ऐकावं.. कोणीही या देशाच्या संविधाना विरोधात वागू शकत नाही. आज तुमची बहिण पोलिस ठाण्यात आहे तर या तिला वाचवायला.. '

हेही वाचा:मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

राखीच्या अटकेवर प्रतिक्रिया देताना शर्लिन म्हणाली की, 'पोलिसांनी त्वरीत कारवाई केली याचा तिला आनंद आहे'.

इतकेच नव्हे तर तर साजिद खान बिग बॉसच्या घरात गेला होता तेव्हा त्याला तिथे पाहूनही शर्लिनचा संताप झाला होता. आणि त्यानंतर राखी आणि शर्लिन यांच्यात वाद सुरू झाला . शर्लिनने बिग बॉसमध्ये साजिद खानच्या सहभागाला विरोध केल्यावर दोघींमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले.

लैंगिक शोषण करणाऱ्याला नॅशनल टेलीव्हिजनवर दाखवलं जात आहे,असा आरोप देखील शर्लिननं केला होता. Metoo आंदोलना दरम्यान शर्लिनने साजिद खानवर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता.

शर्लिनने Metoo आरोपी बोलत साजिद खानवर थेट निशाणा साधला. तेव्हा राखीनं शर्लिनच्या विरोधात जात साजिद खानची बाजू घेतली होती. त्याचाच राग शर्लिननं राखीवर काढल्याचं म्हटलं जात आहे. तसंच,बिग बॉसमध्ये साजिदला घेतल्यामुळे शर्लिन आता सलमानवरही तोच राग काढत असल्याची चर्चा सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT