Farhan Akhtar,Shibani Dandekar Instagram
मनोरंजन

शिबानी दांडेकर प्रेग्नंट? म्हणून उरकलं झटपट लग्न?

सोशल मीडियावर शिबानीच्या प्रेगनन्सीच्या बातमीवरुन गोंधळ उडाला आहे.

प्रणाली मोरे

शिबानी दांडेकर(Shibani Dandekar)नं तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर लग्नातील फरहानसोबतचे काही सुंदर फोटो शेअर केले होते,ज्या फोटोंवर चाहत्यांनी मनापासून शुभेच्छांचा वर्षाव केला. पण लग्नानंतर तिनं फरहान(Farhan Akhtar)सोबत एका खास रोमॅंटिक फोटोशूटचे काही फोटो शेअर केले,त्यानंतर मात्र सोशल मीडियावर एक वेगळीच चर्चा रंगली आहे. फरहानसोबतच्या त्या खास फोटोशूटवरनं शिबानी प्रेग्नंट असल्याच्या चर्चेला नुसतं उधाण आलं आहे.

लग्नानंतरच्या शिबानी-फरहानच्या त्या फोटोवर वेगळ्याच प्रतिक्रिया नोंदवायला सुरुवात झाली आहे. चाहत्यांनी थेट शिबानीला प्रश्न विचारला आहे की,''तु प्रेग्नंट आहेस का?'' तर एका चाहतीनं थेट आई होण्यासाठी तिला शुभेच्छाच दिल्या आहे. एका चाहत्यानं प्रश्न केलाय की,'लपवली का बातमी?' आता यावर शिबानीनं अद्याप आपल्या चाहत्यांना काहीच प्रत्युत्तर केलेलं नाही. शिबानीनं याआधी आपल्या एका पोस्टमध्ये हातावरील टॅटूची इमेज पोस्ट केली होती. त्यावरुनही चाहते तिच्यावर भारी खूश झाले होते.

तो टॅटू म्हणजे तिनं त्या माध्यमातून तिची लग्नाची तारीख गोंदवली होती. चार वर्षांच्या अफेअरनंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला होता. खंडाळा येथे जावेद अख्तर(Javed Akhtar) यांच्या फार्महाऊसवर शिबानी-फरहान लग्नबंधनात अडकले. अगदी मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला होता. शिबानी-फरहानच्या लग्नाआधीच्या संगीत,मेहंदीच्या सोहळ्यांच्या फोटोंनीही सोशल मीडियावर प्रशंसा मिळवली होती. त्यांच्या ख्रिश्चन धर्माच्या पद्धतीनं लागलेल्या लग्नासोबतच आगळ्या-वेगळ्या एकमेकांना वचन देण्याच्या लग्नपद्धतीचंही विशेष कौतूक करण्यात आलं. पण आता या नवीन फोटो पोस्टमुळे शिबानी,'लग्नाआधीच प्रेग्नंट होती का?' हे जे प्रश्न विचारले जात आहेत त्यावर शिबानी काय उत्तर देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. जर ही गोष्ट खरी असेल तर 'मि. अॅन्ड मिसेस.अख्तरचे अभिनंदन' पण अफवा असेल तर शिबानीला 'वर्कआऊट जास्त करण्याची गरज आहे असं म्हणायचं का की पोझ देताना कुठेतरी चुकलं म्हणायचं'.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT