Farhan Akhtar,Shibani Dandekar Google
मनोरंजन

''लग्नानंतर मी फक्त शिबानी दांडेकर-अख्तर नाही तर..''; नाव असं बदललं

३ वर्षांच्या रीलेशनशीपनंतर दिग्दर्शक-अभिनेता फरहान अख्तरसोबत तिनं लग्नगाठ बांधली.

प्रणाली मोरे

फरहान अख्तर (Farhan Akhtar) आणि शिबानी दांडेकर (Shibani Dandekar) यांचं अगदी घरातल्या जवळच्या आणि काही मोजक्याच मित्र परिवाराच्या उपस्थितीत खंडाळा इथं थोड्या हटके पद्धतीनं लग्न पार पडलं. यांच्या लग्नात ना सप्तपदीचे सूर आळवले गेले,ना कबुल,कबुल ऐकायला मिळालं तर यांच्या लग्नात दोघांनी चक्क एकमेकांना जन्मभर निभवायची वचनं दिली ती सर्वांच्या समोर वाचून दाखवत. फरहान अख्तरशी लग्न झाल्यानंतर शिबानीनं आता इन्स्टाग्रामवरील आपल्या प्रोफाईलच्या नावातही एक बदल केला आहे. अर्थात आता सगळ्यांनाच वाटलं असेल लग्नानंतर जसे सर्व मुली नवऱ्याचं नावदेखील जोडतात तसं शिबानीनं केलं असेल त्यात काय नवीन. पण नाही शिबानीनं तिच्या क्रिएटिव्हीटीला जरा जास्त ताण देऊन एक वेगळं नाव देखील आपल्या प्रोफाईलमध्ये अॅड केलं आहे. सध्या इन्स्टाग्रामवर तिच्या या नव्या नावाची चर्चा होऊ लागली आहे. फरहान आणि शिबानीनं खंडाळा इथं लग्नगाठ बांधल्यानंतर सोमवारी कोर्ट मॅरेजही केलं.

Shibani Dandekar Instagram Post image

तर इन्स्टाग्रामवर शिबानीनं आपलं नाव बदलून लिहिलं आहे,शिबानी दांडेकर-अख्तर. आता हा असा बदल साऱ्याच मुली करतातच. पण शिबानीन आणखी एक नाव त्या प्रोफाईलमध्ये अॅड केलं आहे बरं का. ते तिनं आपल्या प्रोफाईला दिलेल्या एका टायटल प्रमाणे भासत आहे. तिच्या बायो मध्ये लिहिलं आहे-''Producer,Presenter,Actress,Singer.Mrs AKHTAR'' तर शिबानीनं दिलेलं 'मिसेस.अख्तर' हे नवीन नामकरणं सध्या सगळ्यांसाठी चर्चेचा विषय आहे. ती फार-फार तर शिबानी दांडेकर-अख्तर हा बदल करेल हे अपेक्षित होतं, पण 'मिसेस अख्तर' हा बदल अनेकांना अपेक्षित नव्हता,जो तिनं केलेला आहे. पण छान वाटतंय की ऐकायला.

या दोघांचा लग्नसोहळा खूपच प्रायव्हेट होता. फार पाहुण्यांना निमंत्रण नव्हतं. पण थोडक्यातही मजा असतेच,आनंद घेता येतोच. जो त्यांच्या लग्नाच्या फोटोंमधून,व्हिडीओंमधून त्यांनी उपभोगलेला दिसत आहे. फरहान अख्तरचे वडील ज्येष्ठ लेखक जावेद अख्तर यांच्या खंडाळा येथील फार्म हाऊसवर पार पडलेल्या या सोहळ्यात शबाना आझमी,फरहानची आई हनी ईराणी,बहिण झोया अख्तर, शिबानीची बहिण अनुषा दांडेकर,मैत्रिण रिया चक्रवर्ती,अभिनेता हृतिक रोशन आणि कुटुंबिय,फराह खान अशी मंडळी प्रामुख्यानं हजर होती. फरहान अख्तर याचं हे दुसरं लग्न असून याआधी त्यानं सेलिब्रिटी हेअरड्रेसर अधुना भबानी हिच्याशी लग्न केलं होतं. तब्बल सोळा वर्षानंतर या दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. फरहानला पहिल्या पत्नीपासून दोन मुली आहेत. शक्या आणि अकिरा अशी त्यांची नावं आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

Pune Cyber Crime : लग्नाचे आमिष दाखवून पुण्यात ४३ वर्षीय महिलेला २६ लाखांचा गंडा; येरवड्यात गुन्हा दाखल!

Raj Thackeray: पैसे फेकले की जनता विकत मिळते? ठाकरे बंधूंचा सरकारला थेट सवाल, राज ठाकरे म्हणाले- निवडणूक जिंकण्यासाठी...

SCROLL FOR NEXT