neha khan 
मनोरंजन

'शिकारी' फेम नेहा खानचा डान्सव्यतिरिक्त 'हा' आहे आवडता छंद..बघुन प्रेक्षकही झाले आश्चर्यचकित

दिपालीराणे-म्हात्रे, प्रतिनिधी

मुंबई-  कोरोना व्हायरसचा देशातच नाही तर जगभरात सुळसुळाट झालेला आहे. त्यातच रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने देशात लॉकडाऊनदेखील ३ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे..लॉकडाऊनमुळे सगळे घरातंच आहेत. मात्र मिळालेल्या या वेळेत करायचं काय असा प्रश्न जरी पडत असला तरी याचं उत्तर या वेळेतच अनेकांना सापडत आहे.. या वेळेत बहुतांश लोक त्यांचे छंद जोपासत आहेत. अनेक सेलिब्रिटी या वेळेचा पुरेपूर उपयोग करत आहेत...काहीजण स्वयंपाकाची हौस पुर्ण करत आहेत तर काहीजण आपल्या आवडीनिवडींकडे जास्त लक्ष देताना दिसून येत आहेत..अभिनेत्री-डान्सर नेहा खानसुद्धा या दरम्यान तिचे छंद जोपासत आहे..डान्समुळे प्रसिद्ध असलेल्या नेहाचा हा छुपा छंदही आता प्रेक्षकांसमोर आला आहे..

'आपण राहिलो घरी, तर कोरोना जाईल माघारी' अशी 'झी'ने घातलेली साद, सर्व सेलिब्रिटी मंडळी सुद्धा पाळताना दिसत आहेत.'झी युवा'वरील 'युवा डान्सिंग क्विन'ची धडाकेबाज स्पर्धक नेहा खान लॉकडाऊनमध्ये घरात बसून काही तरी वेगळं करत आहे. आपल्या अभिनय आणि  नृत्याने नेहानी सर्वांची मनं जिंकली आहेत. नेहाला आधीपासूनच नृत्याची आवड आहे. 'युवा डान्सिंग क्विन'मध्ये  तिच्या डान्सचं कौतुक होत आहे. लॉकडाऊनमध्ये नेहाचा एक वेगळाच पैलू तिच्या चाहत्यांना पाहायला मिळतोय. नेहा खानला स्केचिंगची आवड आहे. लॉकडाऊनमुळे ती सुद्धा घरात आहे आणि तिचा हा आवडता छंद जोपासत आहे..

नेहाने बऱ्याच वर्षांनी पुन्हा स्केचिंगला सुरुवात केली आहे. तिने तिचं पहिलं स्केच इंस्टाग्रामवर पोस्ट करताना म्हटलं आहे, 'क्वारंटाईनमुळे मी पुन्हा माझ्या लहानपणीचा छंद जोपासत आहे..' हे लिहिताना तिने तिचं मांजरीचं स्केच पोस्ट केलं आहे..तिच्या या स्केचिंगचं तिच्या चाहत्यांनी कौतुक केलं आहे..यानंतर काही दिवसातंच तिने तिचे स्वतःच्या दोन कॅरेक्टरचं स्केट रेखाटलं होतं..

नुकतंच तिनं स्वत:चं आणि तिच्या आईचं चित्र रेखाटलं आहे. त्याचा व्हिडीओही तिने पोस्ट केला आहे..तिचा हा व्हिडिओ चाहत्यांना आवडला असून तिच्या व्हिडिओवर अनेकांनी सुंदर कलाकृती असं म्हणत कमेंट देखील केल्या आहेत..

नेहा शिकारी या मराठी सिनेमातील तिच्या बोल्ड लूकमुळे चर्चेत आली होती...अभिनयानंतर नेहाला प्रेक्षक तिच्या डान्समुळे ओळखत होते मात्र लॉकडाऊन दरम्यान आता तिची नवी कला देखील प्रेक्षकांसमोर आली आहे..

shikari fame actress neha khans sketching hobby revealed during lockdown 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महात्मा गांधींच्या पुतळ्याला भाजपची टोपी, हातात पक्षाचा झेंडा; NDAच्या शिबिरात नेत्यांचा प्रताप, काँग्रेसचा हल्लाबोल

Maharashtra Politics : ३२ टक्के राजकारणी घराणेशाहीचे प्रतिक; ‘एडीआर’च्या अहवालातील महाराष्ट्राची स्थिती

Pune News : पुण्यातील शेतकऱ्याच्या अनोख्या आंदोलनाची चर्चा; तीन वेळा आमरण उपोषण करूनही दखल नाही, आता थेट कारवरच...

IND vs PAK Asia Cup 2025: पहलगाम हल्ल्यानंतर युद्ध केलंत, तेही नीट केले नाही, मागे हटायला...; पाकिस्तानी खेळाडूचं वादग्रस्त विधान

Wholesale Inflation India : घाऊक महागाईचा दर वाढला! 4 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचली आकडेवारी, सामान्य जनतेला फटका

SCROLL FOR NEXT