Shilpa Shetty News
Shilpa Shetty News  esakal
मनोरंजन

Shilpa Shetty Crush: बॉलीवूडच्या कोणत्या अभिनेत्यावर शिल्पा शेट्टीचा 'क्रश'

युगंधर ताजणे

Shilpa Shetty Crush: बॉलीवूडमध्ये आपल्या फिटनेससाठी नेहमीच सोशल (bollywood news) मीडियावर अॅक्टिव्ह असणारी अभिनेत्री म्हणजे शिल्पा शेट्टी. या अभिनेत्रीचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. काही दिवसांपूर्वी शिल्पाचा (bollywood Actress) जन्मदिवस साजरा करण्यात आला. यावेळी तिच्यासंबंधी ज्या काही गोष्टी सोशल मीडियावरुन व्हायरल झाल्या होत्या त्यात गुगलवर (shilpa shetty) सर्वाधिक ट्रेडिंग असलेली अभिनेत्री म्हणून शिल्पाच्या नावाचा उल्लेख केला गेला होता. शिल्पा ही तिच्या वेगवेगळ्या कारणांसाठी सोशल मीडियावर चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. गेल्या वर्षी ती तिच्या पती राज कुंद्रामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली होती.

शिल्पाला काय आवडते, तिचा आवडता अभिनेता कोण आहे, तिला खायला काय (entertainment news) आवडतं या साऱ्या गोष्टींमध्ये नेटकऱ्यांना कमालीचा रस आहे, सध्या शिल्पाच्या बाबत एक बातमी व्हायरल झाली आहे. ती म्हणजे तिचं कोणत्या अभिनेत्यावर क्रश आहे. त्या अभिनेत्याचं नाव शिल्पानं एका मुलाखतीतमध्ये सांगितलं. त्यानंतर तिला नेटकऱ्यांनी वेगवेगळे प्रश्न विचारुन भंडावून सोडलं आहे.

शिल्पाचं ज्या बॉलीवूड अभिनेत्यावर क्रश आहे तो सध्या बॉलीवूडमधील सर्वात प्रसिद्ध अभिनेता आहे. लाखो युवती त्याच्या चाहत्या आहेत. शिल्पा शेट्टीला जेव्हा त्याचे नाव सांगण्याचा आग्रह करण्यात आला तेव्हा तिनं सांगितलं की, तिला कार्तिक आर्यन हा अभिनेता आवडतो. झुम टीव्हीसोबत झालेल्या एका मुलाखतीमध्ये शिल्पा सोबत झालेल्या रॅपिड फायर राउंडमध्ये शिल्पानं तिला विचारलेल्या प्रश्नावर उत्तर दिलं आहे. गेल्या काही दिवसांत कार्तिक आर्यन हा फॉर्ममध्ये आहे. त्याच्या भुलभुलैय्या 2 या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

एका मुलाखतीमध्ये शिल्पा शेट्टीनं सांगितलं होतं की, माझा जेव्हा दहावीचा निकाल लागला होता. त्यानंतर मी जेव्हा तो आईला दाखवला तेव्हा तिनं मला निक्कमी असं म्हटलं होतं. ई टाईम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये शिल्पानं तिच्या वेगवेगळ्या आठवणींना उजाळा दिला. आई मला म्हणाली होती की, तू काहीही कामाची नाहीस. तू यापुढे काहीही शिकु नकोस, असं तिनं मला म्हटलं होतं. शिल्पाच्या आगामी प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास तिचा निक्कमा नावाचा चित्रपट सध्या चर्चेत आहे. तो उद्या (17 जुन) प्रदर्शित होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI: गुंतवणूकदार मालामाल! रिझर्व्ह बँकेचा एक निर्णय अन् कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत

ICC Ranking: वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियाने भारताकडून हिसकावलं कसोटीचं सिंहासन; पण वनडे - टी20 मध्ये रोहितसेनाच अव्वल

Dharmendra And Hema Malini: 44 वर्षानंतर धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी पुन्हा केलं लग्न? रोमँटिक फोटो व्हायरल

Planet Nine : नेपच्यूनच्या पलीकडे असू शकतो आणखी एक ग्रह; आतापर्यंत राहिला होता लपून.. शास्त्रज्ञांना मिळाले नवे पुरावे!

Solapur Lok Sabha Ground Report: राम सातपुतेंना धक्का बसणार की प्रणिती शिंदेंना? वंचित गेम चेंजर ठरणार...ग्राऊंड रिपोर्ट वाचा...

SCROLL FOR NEXT