shilpa shetty Sakal
मनोरंजन

२१ लाख फसवणूक प्रकरण: शिल्पा शेट्टी आणि कुटुंबाला न्यायालयाचे समन्स

2015 मध्ये 21 लाख रुपयांचं कर्ज शेट्टी कुटुंबियांनी घेतलं होतं पण ते परतफेड करण्यात शेट्टी कुटूंबीय अयशस्वी ठरले होते.

दत्ता लवांडे

मुंबई : २०१५ साली घेतलेल्या कर्जाची परतफेड न केल्याने शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty), तीची आई सुनंदा शेट्टी आणि बहीण शमिता यांना कोर्टाने समन्स बजावलं आहे. अंधेरीच्या न्यायदंडाधिकारी न्यायालयाकडून समन्स बजावण्यात आलंय. 2015 मध्ये 21 लाख रुपयांचं कर्ज शेट्टी कुटुंबियांनी घेतलं होतं पण ते परतफेड करण्यात शेट्टी कुटूंबीय अयशस्वी ठरले होते. (Shilpa Shetty Family Court Notice)

२०१५ मध्ये शेट्टी कुटुंबियाने कॉर्गिफ्ट्स कंपनीच्या नावावर २१ लाख रुपयांचं कर्ज घेतलं होतं. याच कंपनीत शिल्पा, तीचे वडील, आई आणि बहीण भागीदार होते. या कंपनीच्या नावावर त्यांनी कर्ज काढलं होतं. पण २०१६ मध्ये शिल्पाच्या वडिलांचं निधन झालं. त्यानंतर शेट्टी कुटुंबियांनी कर्जाची परतफेड करण्यास नकार दिला होता. त्यानंतर अमरा या ऑटोमोबाईल एजन्सीच्या मालकाने शेट्टी कुटुंबाला नोटीस पाठवून जुहू पोलिस ठाण्यात लेखी तक्रार केली होती. त्यानंतर त्यांनी अंधेरी येथील मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टात खासगी तक्रारसुद्धा दाखल केली होती.

या प्रकरानंतरही शेट्टी कुटुंब कर्जाची परतफेड करण्यास अयशस्वी ठरले. त्यानंतर अमरा या ऑटोमोबाईल एजन्सीच्या मालकाने २१ लाखांची फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली. दरम्यान अंधेरीच्या न्यायदंडाधिकारी न्यायालयाकडून या कुटुंबाला समन्स बजावण्यात आलं आहे. तसंच २८ फेब्रुवारीला न्यायालयात हजर राहण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. शिल्पा शेट्टीसह बहीण शमिता आणि आई सुनंदा शेट्टी यांनादेखील न्यायालयाने समन्स बजावलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: शिक्षणासाठी पैसा खर्च करता, पण रोजगाराचे मार्ग बंद; हजार युवांपैकी फक्त १२ जणांना कायमची नोकरी, राहुल गांधींचा सरकारवर निशाणा

Shirur News : हाताच्या फ्रॅक्चरच्या शस्त्रक्रियेसाठी आलेल्या महिलेचा शस्त्रक्रियेदरम्यान मृत्यु; महिलेच्या कुटूंबियांचा आक्रोश

ऐकावं ते नवलंच! श्वानासारखं दिसण्यासाठी २६ वर्षीय तरुणाने खर्च केले तब्बल २२० कोटी रुपये; पाहा VIDEO

Shirur News : घोडनदीच्या पूलावरून पात्रात उडी घेतलेल्या महिलेचा मृतदेह सापडला

Latest Marathi News Live Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा...

SCROLL FOR NEXT