raj kundra
raj kundra  
मनोरंजन

राज कुंद्राच्या जामीन याचिकेवर 10 ऑगस्टला सुनावणी

युगंधर ताजणे

मुंबई - पॉर्नोग्राफी प्रकरणात (pornography video) अडकलेल्या अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (shilpa shetty) पती आणि बिझनेसमन राज कुंद्रा (raj kundra) याच्या अडचणी आणखी वाढण्याच्या शक्यता आहेत. त्यानं यापूर्वी न्यायालयात जामीनासाठी दोन वेळा अर्ज केला होता. न्यायालयानं तो फेटाळून लावला. राज कुंद्रा आणि रेयॉन थोर्प यांच्या त्या जामीन याचिकेवर आता 10 ऑगस्टला सुनावणी होणार आहे. आज पोलिसांना न्यायालयानं त्या दोघांच्या जामीन याचिकेवर नोटीस पाठवण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज कुंद्राच्या पॉर्नोग्राफी प्रकरणानं वेगळं वळण घेतल्याचे दिसत आहे.

राज कुंद्रा आणि त्याचा सहकारी रयान थॉर्प हे दोघेही सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. राजला मुंबई क्राईम ब्रँचनं पॉर्न व्हिडिओ तयार करणे आणि ते आपल्या अॅपच्या माध्यमातून अपलोड करणे यासाठी अटक केली आहे. यापूर्वी मुंबई पोलिसांनी त्याच्या घरावर छापा टाकून अनेक गोष्टी जप्त केल्या आहेत. त्यात राजचा मोबाईल, हार्ड डिस्क, लॅपटॉप यांचा समावेश आहे. दोन दिवसांपूर्वी गहना वसिष्ठनं राजला मुंबई पोलिसांनी केलेली अटक बेकायदेशीर असल्याचे सांगून खळबळ उडवून दिली होती. राजच्या एका सर्व्हरमधून पोलिसांनी 70 अश्लील व्हिडिओ जप्त केले होते.

मुंबई पोलीस या प्रकरणाचा कसून शोध घेताना दिसत आहे. त्यांच्या हाती राजच्या विरोधात भक्कम पुरावे असल्याचे त्यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजनं त्या पॉर्नोग्राफी व्हिडिओच्या माध्यमातून 1.17 कोटी रूपये कमावले आहेत. हे पैसे त्यानं ऑगस्ट 2020 ते डिसेंबर 2020 च्या दरम्यान कमावले आहेत. राजनं आपल्याला केलेली अटक ही बेकायदेशीर असल्याचे सांगितले आहे. मात्र कोर्टानं त्याला जामीन देण्यास नकार दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'प्रज्वल रेवण्णांचे व्हिडिओ आताचे नाहीत'; पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं थेट भाष्य

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. शरद पवार, अमित शाहांनी बजावला मतदानाचा हक्क

Share Market Today: शेअर बाजारात आजही घसरण होणार का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Sabudana Paratha Recipe : नाश्त्याला झटपट बनवा चविष्ट साबुदाणा पराठा, पोषणासोबतच मिळेल भरपूर ऊर्जा, वाचा सोपी रेसिपी

Election Ink: इतिहास निवडणूक शाईचा; जाणून घ्या कुठे अन् कशी तयार होते मतदारांच्या बोटाला लागणारी शाई

SCROLL FOR NEXT