'तेव्हा माझ्यासोबत जे घडलं ती आठवण यातनादायी'

बॉलीवूडमधील (bollywood) काही अभिनेत्री या अशा आहेत की त्यांनी आपल्यावर जो पदार्पणाच्या काळात जो अन्याय झालाय त्याविषयी कधीही वाच्यता केलेली नाही.
'तेव्हा माझ्यासोबत जे घडलं ती आठवण यातनादायी'

मुंबई - बॉलीवूडमधील (bollywood) काही अभिनेत्री या अशा आहेत की त्यांनी आपल्यावर जो पदार्पणाच्या काळात जो अन्याय झालाय त्याविषयी कधीही वाच्यता केलेली नाही. मात्र अनेकदा आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळेस त्या माध्यमांना सामोऱ्या जातात तेव्हा त्यांना त्या प्रकारचा प्रश्न हमखास येतो.अशाप्रसंगी मात्र त्या अभिनेत्री कमालीच्या भावूक होतात. आणि त्या आठवणीमध्ये संबंधित कलाकाराचं नावही घेतात. त्यानंतर मोठ्य़ा वादाला सुरुवात होते. असाच काहीसा प्रकार एका अभिनेत्रीविषयी घडला आहे. ती अभिनेत्री सोशल मीडिया सेलिब्रेटी (social media) आहे.

अभिनेत्री चित्रांगदा सिंग (chitragandha singh) ही तिच्या वेगळेपणासाठी प्रसिद्ध आहे. ती सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणारी सेलिब्रेटी आहे. तिचा फॅन फॉलोअर्सही मोठा आहे. आपले वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ शेयर करुन ती चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. हजारो ख्वाईशी ऐसी या चित्रपटापासून तिनं चाहत्यांची पसंती मिळवण्यास सुरुवात केली. त्या चित्रपटातील तिच्या अभिनयाला प्रेक्षकांची पोचपावती मिळाली होती. समीक्षकांनी देखील तिचं कौतूक केलं होतं. चित्रगंधा सिंग आता चर्चेत आली आहे ते तिच्या वेगळ्या प्रतिक्रियेविषयी त्यात आपण जेव्हा बॉलीवूडमध्ये आलो तेव्हा एका धक्कादायक अनुभवाला आपल्याला सामोरं जावं लागल्याचं तिनं सांगितलं आहे.

2017 मध्ये चित्रांगदा सिंग ची बाबुमोशाय बंदुकबाज नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याचं प्रोडक्शन कुशान नंदी यांचे होते. त्यात नवाझुद्दीन सिद्धिकी याची प्रमुख भूमिका होती. भलेही बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट चालला नसेल, मात्र चित्रांगदाच्या आरोपानं सर्वाचं लक्ष वेधून घेतलं होतं. 2018 मध्ये जेव्हा मी टूच्या आरोपांची चर्चा सुरु झाली होती तेव्हा बॉलीवूडमधील अनेक अभिनेत्रींनी आपल्यावर झालेल्या आरोपांविषयी प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. चित्रगंधानं बाबुमोशायच्या सेटवर आपल्या आलेल्या त्या अनुभवाविषयी सांगितलं.

'तेव्हा माझ्यासोबत जे घडलं ती आठवण यातनादायी'
बाथरुममध्ये मारहाण, अभिनेत्री आरजु गोवित्रीकरचा घटस्फोटासाठी अर्ज

लखनऊमध्ये चित्रांगदावर एक हॉट दृश्य चित्रित केले जात होते. तेव्हा मला अगोदर त्या सीनविषयी काहीच सांगितलं नाही. माझा आणि नवाझु्ददीनचा तो सीन होता. मात्र निर्मात्यांची माझ्याकडून वेगळीच अपेक्षा होती. जेव्हा मी ते ऐकले तेव्हा मला रडू कोसळलं. अशी भावना चित्रगंधानं यावेळी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com