Shilpa Shetty husband raj kundra to appear in salman khan show big boss 16,know how much fees he is taking and his demands to makers  Google
मनोरंजन

Big Boss 16: शिल्पाचा नवरा राज कुंद्रा बिग बॉसच्या घरात, फी व डिमांड्स ऐकून बसेल झटका

शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्रा पोर्नोग्राफी केसमध्ये अडकला होता,जेलची हवा खाऊन आल्यानंतर मात्र तो मीडियापासून जरा लांबच राहत होता.

प्रणाली मोरे

Raj Kundra In Big Boss 16: शिल्पा शेट्टीचा पती आणि व्यावसायिक राज कुंद्रा विषयी सध्या बातमी कानावर पडतेय की तो बिग बॉसमध्ये सामिल होऊ शकतो. राज कुंद्रा पोर्नोग्राफी केसमध्ये अडकला होता,जेलची हवा खाऊन आल्यानंतर मात्र तो मीडियापासून जरा लांबच राहत होता. लाइमलाइटमध्ये येणं झालं तरी मास्क लावून फिरत होता. सोशल मीडियापासूनही दूर दूर होता.

आता त्याच्याविषयी बातमी समोर येतेय की सलमान खानचा शो बिग बॉस सिझन १६ मध्ये तो दिसणार आहे. आणि आपल्या आयुष्याविषयी कदाचित मोठे खुलासे करण्याची शक्यता आहे. एवढंच नाही बातमी आहे की शो मध्ये तो गेस्ट म्हणून नाही तर स्पर्धक म्हणून येण्यासाठी मोठी तगडी फी आकारत आहे. अर्थात यासंदर्भात राज कुंद्रा कडून काहीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही.(Shilpa Shetty husband raj kundra to appear in salman khan show big boss 16,know how much fees he is taking and his demands to makers)

एका न्यूज पोर्टलच्या रिपोर्टनुसार, शो विषयी राज आणि मेकर्समध्ये सध्या बातचीत सुरु आहे. राजने पूर्ण सीझनसाठी ३० करोड रुपये मागितले आहेत,जी रक्कम खूपच मोठी आहे. याव्यतिरिक्त त्याची ही देखील मागणी आहे की त्याला शो मध्ये अधिक काळ ठेवण्यात यावं.

एवढंच नाही तर वेबसाईटच्या माहितीनुसार राजने मेकर्सला सांगितलं आहे की,त्याला जे मानधन देण्यात येईल ते NGO ला डोनेट करण्यात यावं. शो मधून मिळणारा एकही पैसा तो स्वतःसाठी ठेवणार नाही. त्याची आणि पत्नी शिल्पाची मिळून खूप संपत्ती आहे. जर खरंच राजची ही मागणी असेल तर त्याला सकारात्मकतेने सगळेच स्विकारतील आणि लोक त्याला भरघोस वोट करतील. कारण पॉर्न फिल्म रॅकेट प्रकरणात त्याचं नाव समोर आल्यानंतर त्याची प्रतिमा तशीची डागाळली होती.

माहितीसाठी इथं सांगतो की, २१ सप्टेंबरला पॉर्न केस प्रकरणात तुरुंगात गेलेल्या राजला सुटून १ वर्ष झाल्यानंतर पहिल्यांदा त्यानं यावर भाष्य केलं. त्यानं आपला फोटो शेअर केला ज्यावर त्यानं चेहऱ्यावर मास्क लावला होता आणि डार्क सनग्लासेस घातलेले दिसले. फोटोवर लिहिलं आहे,'जर तुम्हाला पूर्ण गोष्ट माहीत नाही तर काहीही बोलू नका'.

या फोटोला शेअर करत राजने लिहिलं होतं,''आजच्या दिवशी जेलमधून बाहेर आल्याला वर्ष झालं. हे प्रकरण माझ्यासाठी एका वाईट स्वप्नासारखं आहे, पण मला न्याय जरुर मिळेल. सत्य लवकरच समोर येईल. पण ज्यांनी या संपूर्ण प्रकरणात माझ्यासाठी प्रार्थना केली त्यांचे मी आभार मानेन,आणि ज्यांनी मला ट्रोल केलं त्यांचेही मनापासून धन्यवाद कारण त्यांनीही मला स्ट्रॉंग केलं''.

जेलमधून बाहेर आल्यानंतर राज सार्वजनिक ठिकाही मास्क लावूनच फिरतो. मास्क,सनग्लासेस आणि कॅप घालतो म्हणजे त्याच्या चेहरा नाही दिसणार. पहिल्यासारखं तो मीडियाशी संवाद करणं देखील टाळतो. पण असं असताना बिग बॉस १६ मध्ये यायला तो कसा तयार होतोय यामुळे मात्र जोरदार चर्चा रंगली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT