मनोरंजन

ती पुन्हा आली, शिल्पा शेट्टी पुन्हा 'सुपर डान्सच्या सेटवर'

कुणी काही का म्हणेना शिल्पा शेट्टीनं गेल्या दोन ते तीन आठवड्यांपासून वेगवेगळ्या आरोपांना तोंड दिलं आहे.

युगंधर ताजणे

मुंबई - कुणी काही का म्हणेना शिल्पा शेट्टीनं गेल्या दोन ते तीन आठवड्यांपासून वेगवेगळ्या आरोपांना तोंड दिलं आहे. काही माध्यमांच्या विरोधाही तिनं न्यायालयात धाव घेतली होती. तिचं म्हणणं असं होतं की, राज कुंद्राच्या प्रकरणाचे वार्तांकन करताना माध्यमांनी तिची प्रतिमा मलीन केली. त्याचा परिणाम ती करत असलेल्या वेगवेगळ्या प्रॉडक्टच्या ब्रँण्डिंगवर झाल्याचेही दिसून आले. आता शिल्पाही एका संकटात सापडली आहे. ती आणि तिची आई या दोघींवर लखनऊ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघींनी आपली एक कंपनी स्थापन करताना लोकांकडून पैसे घेतले होते. मात्र त्यांना ते वेळेत परत न केल्यानं त्यांनी या दोघींविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आता शिल्पा चर्चेत आली आहे ते पुन्हा ती सुपर डान्सरच्या सेटवर दिसल्यामुळे.

राजवर पॉर्नोग्राफी व्हिडिओ तयार करणे आणि तो शेयर करणे यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र त्यानंतर शिल्पा मोठ्या प्रमाणात ट्रोल झाली होती. तिला युझर्सनं मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली होती. त्याचा परिणाम शिल्पाच्या सोशल लाईफवर झाल्याचेही दिसून आले आहे. राजला अटक झाल्यानंतर त्यामुळे शिल्पाकडे जे काही रियॅलिटी शो होते त्यातून तिला बाहेर जावं लागलं होत. कारण तिला युझर्सनं ट्रोल केलं होतं. शिल्पा सुपर डान्सच्या शो मध्ये परिक्षकाच्या भूमिकेत आहे. अचानक राजच्या पॉर्नोग्राफी प्रकरणामुळे तिला त्या पदावरुन माघार घ्यावी लागली आहे. त्यावेळी त्या कार्यक्रमामध्ये प्रसिद्ध अभिनेत्री करिश्मा कपूरला बोलावण्यात आले होते.

सुपर डान्समध्ये पुन्हा शिल्पाची इंट्री झाली आहे. त्या शो च्या सेटवर ती दिसून आली आहे. त्यावेळी ती व्हॅनिटी व्हॅनमधून त्या सेटवर जाताना दिसली आहे. त्या व्हिडिओमध्ये तिनं लाल रंगाची साडी परिधान केली आहे. शिल्पा पुन्हा त्या कार्यक्रमामध्ये आल्यानं तिच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. मात्र ज्या वाहिनीवर तो कार्यक्रम प्रसारित होतो त्या चॅनेलकडून अजून अधिकृतपणे कोणत्याही प्रकारचे एक्सप्लेनेशन समोर आलेलं नाही. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या शो चे निर्माते आणि दिग्दर्शक यांच्यात बराचकाळ चर्चा सुरु होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात २ तरुणींचा १९ वर्षीय तरुणावर पहाटे कोयत्यानं हल्ला, घटना CCTVत कैद; धक्कादायक कारण समोर

Dodamarg Eco-Sensitive Area : 'महाराष्ट्राचे ॲमेझॉन' धोक्यात! केंद्राकडून दोडामार्ग तालुका वगळण्याची 'घोड चूक'; वनशक्ती संस्थेचे सरकारला थेट पत्र

Kolhapur Voter List Revision : कोल्हापूर जिल्ह्यातील साडेचार लाख मतदार वगळणार; 'एसआयआर'चे 99.91 टक्के काम पूर्ण, पाहा विधानसभा मतदारसंघनिहाय चित्र

Marathi News Live Updates : भोर तालुक्यातील खड्ड्यांमध्ये भात लावून विद्यार्थ्यांनी वेधले प्रशासनाचे लक्ष

World Record Tiranga Rally: डोंबिवलीत तिरंग्याचा विश्वविक्रमी डौल, ३५ हजार चौरस फुटांच्या ध्वजासह भव्य रॅली

SCROLL FOR NEXT