shilpa  
मनोरंजन

मुलीच्या जन्माच्या तीन महिन्यानंतर शिल्पा शेट्टीने सांगितलं का घेतला होता सरोगसीचा निर्णय?

सकाळवृत्तसेवा

मुंबई- शिल्पा शेट्टीसाठी हे वर्ष खास होतं कारण ती आई झाली. १५ फेब्रुवारीला तिच्या मुलीचा जन्म सरोगसीद्वारे झाला. आता शिल्पाने या गोष्टीचा खुलासा केला आहे की तिने तिच्या या मुलासाठी सरोगसीच्या पर्यायाचा निर्णय का घेतला?  शिल्पा शेट्टीने एका वेबसाईटला दिलेल्या माहितीनुसार सांगितलं की, गेल्या अनेक वेळा तिचं मिसकॅरेज झालं आहे.

शिल्पाने या मुलाखतीत सांगितलं की, तीने मुल दत्तक घेण्याचा सुद्धा विचार केला होता मात्र त्यासाठी मी खूप वेळ वाट पाहिली. वियान नंतर  मला आणखी एक मुल हवं होतं. मात्र मला ऑटो इम्युन डिसीज ज्याला APLA देखील म्हटलं जातं याच्याशी लढा देत होती. यामुळेच मी प्रेग्नंट राहिल्यानंतर माझं मिसकॅरेज होत होतं. हा एक प्रकारे गंभीर आजार होता.

शिल्पा सांगते, मला नाही वाटत की माझा मुलगा वियानने एकुलत्या एका मुलासारखं मोठं व्हावं. मी स्वतः देखील माझ्या लहानबहिणीसोबत मोठी झाले आहे म्हणूनंच मला याचं महत्व माहित आहे. या एका गोष्टीसाठी मी खूप वेगवेगळ्या आयडिया ट्राय केल्या मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. मी मुल दत्तक घेण्यासाठी देखील ४ वर्ष वाट पाहिली. मात्र ते देखील शक्य झालं नाही. या सगळ्यानंतर मी सरोगसीची निर्णय घेतला. 

याआधी देखील शिल्पाने सांगितलं होतं की दुस-या मुलासाठी ती जवळपास ५ वर्ष प्रयत्न करत होती. मी निकम्मा सिनेमा साईन केला आणि हंगामा सिनेमाला माझ्या तारखा दिल्या. तेव्हा मला फेब्रुवारी महिन्यात माझ्या दुस-या मुलाच्या जन्माबद्दल कळालं. त्यानंतर मी पुढचा एक महिना स्वतःला फ्री ठेवलं.   

shilpa shetty reveals why she opted surrogacy  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nandigram Bypoll : पश्चिम बंगालमधील नंदीग्राम पोटनिवडणुकीआधी मोठा ट्विस्ट; ममता बॅनर्जींच्या उमेदवाराची अचानक माघार, नेमकं काय घडलं?

LP Gas Tanker Accident: वाडाखडकोना येथे एलपी गॅस टँकर कलंडला; गळती न झाल्याने मोठा अनर्थ टळला

Festival Makeup Skin Care: सणासुदीला मेकअपमुळे त्वचा बिघडतेय? १० मिनिटांत करा ‘हा’ घरगुती राइस जेल; चेहरा दिसेल फ्रेश

Marathi News Live Updates : UPI व्यवहारांवर शुल्क, व्यापाऱ्यांकडून QR कोड हटवण्याची भूमिका

Pali Stray Dogs: पालीत भटक्या कुत्र्यांचा कहर; १० वर्षांच्या चिमुरडीसह भाविक महिलेला चावा

SCROLL FOR NEXT