raj shilpa 
मनोरंजन

'अशी कामं करायची गरज काय होती?'; चौकशीदरम्यान राजवर ओरडली शिल्पा

शिल्पाच्या घरी छापा घातला तेव्हा राज कुंद्रालाही पोलीस तेथे घेऊन गेले होते.

स्वाती वेमूल

अश्लील चित्रफीतप्रकरणी मुंबई पोलिसांनी शुक्रवारी (२३ जुलै) अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या Shilpa Shetty जुहू इथल्या घरी छापा घातला. पोलिसांनी यावेळी शिल्पा शेट्टीचा जबाब नोंदवून घेतला. कारवाईदरम्यान शिल्पाचा पती आणि या प्रकरणातील मुख्य आरोपी राज कुंद्रालाही Raj Kundra पोलीस तेथे घेऊन गेले होते. यावेळी शिल्पा आणि राज यांच्यात वाद झाला. पोलिसांकडे जबाब नोंदवत असताना शिल्पाला रडूही कोसळलं. 'अशी कामं करायची गरज काय होती', असं विचारत ती सातत्याने राजवर ओरडत होती. या घटनेमुळे संपूर्ण कुटुंबाची प्रतिमा मलिन होत असून अनेक जाहिरातीच्या ब्रँड्सनी माघार घेतल्याचं ती राजला सांगत होती. 'इंडिया टुडे'नं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. राज कुंद्राच्या अश्लील चित्रफीतनिर्मिती व्यवसायाबद्दल माहिती नसून त्यात माझी कोणतीच भूमिका नसल्याचं शिल्पाने पोलिसांना स्पष्ट केलं. 'इरॉटिका हे पॉर्नपेक्षा खूप वेगळं आहे आणि पती राज कुंद्राचा पॉर्न फिल्मनिर्मितीत समावेश नव्हता', असं म्हणत शिल्पाने राजचा बचावही केला. (Shilpa Shetty shouted at Raj Kundra asked him what was the need of doing such things slv92)

पोलिसांनी शिल्पा शेट्टीची चौकशी का केली?

राज कुंद्राने आर्म्स प्राइम मीडिया ही कंपनी स्थापन केली होती. त्याद्वारे त्याने 'हॉटशॉट' हे अॅप लाँच केलं होतं. हे अॅप लंडन इथल्या केनरिन या कंपनीला विकले होते. मात्र राज कुंद्राच्या विआन इंडस्ट्रीज या कंपनीच्या माध्यमातून हे अॅप चालवले जात होते. या अॅपद्वारे पॉर्न चित्रफितींची निर्मिती आणि प्रसारण केले जात होते, असा आरोप आहे. शिल्पा शेट्टीसुद्धा विआन इंडस्ट्रीज कंपनीत एक संचालक होती. त्यामुळे या गुन्ह्यात शिल्पा शेट्टीचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. पोलिसांनी शिल्पाच्या घरातील लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रॉनिक दस्तावेज ताब्यात घेतले.

राज कुंद्राची मुंबई हायकोर्टात धाव

राज कुंद्राने पोलीस कोठडी रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली आहे. जो कंटेंट पोलीस अश्लील म्हणून दाखवत आहेत तो थेट अश्लील वर्तन नसून एका विशिष्ट इच्छुक वर्गासाठी तयार केलेल्या शॉर्टफिल्म्स आहेत, असा दावा कुंद्राने केला आहे. पोलिसांनी केलेली अटक बेकायदेशीर असून त्याची कायदेशीर पूर्वसूचना देण्यात आली नाही. त्यामुळे महानगर दंडाधिकारींनी दिलेला रिमांडही बेकायदेशीर आहे असा दावा कुंद्राने केला आहे. पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार लावलेले आरोपही चुकीचे असून त्याप्रमाणे कोणतेही कृत्य केलेले नाही, असा बचाव याचिकेत केला आहे. विशेष म्हणजे जो कथित कंटेंट अश्लील म्हणून पोलिसांकडून दाखवला जात आहे, तो कोणताही थेट अश्लील वर्तन किंवा अश्लील संबंध नाहीत. उलट हा कंटेंट शॉर्टफिल्म्सच्या माध्यमातून दाखविला असून तो त्या मागणीप्रमाणे विशिष्ट इच्छुक लोकांसाठी तयार केलेला आहे, असा दावा यामध्ये केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock market News : ‘MRF’ स्टॉकशी पुन्हा बरोबरी केली ‘या’ शेअरने! ; 3 रुपयांवरून थेट 300000 पर्यंत वाढली होती किंमत अन् आता...

Vaibhav Taneja : इलॉन मस्कच्या नव्या 'अमेरिका पार्टी'चा खजिनदार भारतीय वंशाचा; कोण आहे सीएफओ वैभव तनेजा?

Jayakwadi Dam: जायकवाडी धरणाने २५ वर्षांचा रेकॉर्ड मोडला; जुलैच्या पहिल्याच आठवड्यात 'इतका' पाणीसाठा

१०व्या मराठी फिल्मफेअर पुरस्कार नामांकनांची यादी जाहीर; कोण ठरणार सर्वोत्कृष्ट? 'या' चित्रपटांमध्ये चुरस

Vasant More : ''शिवतीर्थ, मातोश्री लांब राहिलं आधी आमच्या अंगावर या''; वसंत मोरेंनी घेतला निशिकांत दुबेंचा समाचार...

SCROLL FOR NEXT