मनोरंजन

नवरा तुरुंगातून बाहेर कधी येणार? स्वातंत्र्यदिनी शिल्पा ट्रोल

अभिनेत्री शिल्पा शेट्टी shilpa shetty ही गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेली दिसते आहे.

युगंधर ताजणे

मुंबई - अभिनेत्री शिल्पा शेट्टी shilpa shetty ही गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेली दिसते आहे. तिचा पती बिझनेसमन राज कुंद्रा raj kundra हा सध्या तुरुंगात आहे. त्याला मुंबई क्राइम ब्रँचनं mumbai crime branch पॉर्नोग्राफी व्हिडिओ तयार करणं आणि ते शेयर करणे याप्रकरणी अटक केली आहे. त्यानं यापूर्वी तीन वेळा जामीनासाठी न्यायालयाकडे अर्जही केला होता. मात्र तो अर्ज न्यायालयानं फेटाळून लावला आहे. दुसरीकडे याप्रकरणात शिल्पाचा काही सहभाग आहे का, यासाठी तिला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते. तसेच तीन दिवसांपूर्वी तिच्यावर आणि तिच्या आईवर लखनऊ पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. आपल्या एका कंपनीच्या उभारणीत लोकांकडून लाखो रुपये घेऊन त्यांची फसवणूक केल्याचा आरोप त्या अभिनेत्रीवर करण्यात आला आहे.

आता शिल्पा शेट्टी चर्चेत आला आहे. त्याचे कारण म्हणजे तिनं सोशल मीडियावरुन शेयर केलेली पोस्ट. त्या पोस्टमध्ये तिनं स्वातंत्र्यदिनाच्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र त्या शुभेच्छा दिल्यानंतर ती ट्रोल झाली आहे. त्यावरुन तिला ट्रोल करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी शिल्पानं माध्यमांच्या विरोधातही न्यायालयात धाव घेतली होती. काही माध्यमांनी जाणीवपूर्वक आपली प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तिनं यावेळी केला. मात्र न्यायालयानं त्यावरुन तिला स्पष्ट शब्दांत सांगितलं होतं की, माध्यमांना जर त्यांच्या सुत्रांनी माहिती दिली असेल त्यावर त्यांना दोष देता येणार नाही.

सध्या शिल्पाची बहिण शमिता शेट्टी ही बिग बॉसच्या स्पर्धेत सहभागी झाली आहे. शिल्पानं आपल्या पोस्टमध्ये लिहिले होते की, जगभरात असणाऱ्या माझ्या सर्व भारतीय नागरिकांना स्वातंत्र्यदिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. मात्र त्यावरुन तिला वेगळया प्रकारच्या प्रतिक्रियांना सामोरं जावं लागलं आहे. तिच्या या पोस्टवर एका युझर्सनं म्हटलं आहे की, सुपर से भी उपर कुंद्रा, तर आणखी दुसऱ्या युझर्सनं लिहिलं आहे की, राज कुंद्रा हा जेलमधून बाहेर केव्हा येणार आहे?

शिल्पा शेट्टी सध्या वेगवेगळ्या कारणांमुळे अडचणीत आली आहे. एकीकडे पतीवर झालेला आरोप, त्याचे जेलमध्ये असणे, त्याला जामीन न मिळणे, दुसरीकडे शिल्पा आणि तिच्या आईवर झालेला फसवणूकीचा आरोप, उत्तर प्रदेशातील पोलिसांनी महाराष्ट्रात येऊन तपास करणे त्यामुळे शिल्पा चर्चेत आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT