shilpa shirodkar 
मनोरंजन

शिल्पा शिरोडकर बनली कोरोनाची लस घेणारी पहिली अभिनेत्री

दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई- कोरोना व्हायरसविरुद्ध लढण्यासाठी आता लसीकरण सुरु केलं गेलं आहे. नवीन वर्षात नवीन नागरिकांना हे गिफ्ट मिळालं आहे. भारतात आता याविषयीची रेलचेल सुरु झालेली आहे.ही कोरोनाची लस टोचून घेणा-या अभिनेत्रीने आता तिचा पहिल्यावहिल्या कोरोना लसीकरणाचा अनुभव शेअर केला आहे. हम, गोपी किशन, आंखे, वेबफा सनम, खुदा गवाह सारख्या हिट सिनेमातून तिचं अभिनय कौशल्य दाखवणारी अभिनेत्री शिल्पा शिरोडकर पहिली भारतीय अभिनेत्री आहे जिने नुकतीच कोरोनाची लस घेतली आहे. 

हे ही वाचा: अमिताभ यांचा कोरोना कॉलर ट्युनवरिल आवाज हटवण्यासाठी दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल   

अभिनेत्री शिल्पा शिरोडकर अनेक दिवसांपासून मोठ्या पडद्यापासून लांब आहे मात्र सोशल मिडियावर ती तितकीच ऍक्टीव्ह असते. कोरोनाच्या लसीकरणानंतर तिने तिचा हा अनुभव चाहत्यांसाठी शेअर केला आहे. शिल्पा शिरोडकरने तिचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे आणि सांगितलं आहे की तिला आता कसं वाटतंय.

शिल्पाने चेह-यावर मास्क लावलं आहे आणि तिच्या दंडावर एक छोटी लसीकरणा झाल्यानंतरही पट्टी बांधलेली दिसतेय. हा फोटो सेअर करत तिने लहिलंय, वॅक्सीनेटेड आणि सुरक्षित, हे न्यू नॉर्मल आहे. २०२१ मध्ये येतेय. शिल्पा शिरोडकरचा हा फोटो सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. शिल्पा व्यतिरिक्त आत्तापर्यंत कोणत्याही अभिनेत्रीने लसीकरण केलेलं नाही.

शिल्पाला दुबईमध्ये लसीकरण केलं गेलं आहे. ती लग्नानंतर काही काळ भारतात राहिली होती. त्यानंतर ती दुबईला गेली. शिल्पाने एका मुलाखतीत सांगितलं होतं की २००० मध्ये तिचं लग्न झालं. त्यानंतर तो आणि मी पाच वर्ष लाँग डिस्टंन्समध्ये राहिलो. त्यानंतर ती पुन्हा दुबईला गेली. तिथे कुटुंबासोबत राहते. शिल्पा शिरोडकर लवकरंच मोठ्या पडद्यावर दिसून येणार आहे.   

shilpa shirodkar becomes first actress to get corona vaccine shared experience  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : लासलगावात टर्फ मैदानावर राडा! भांडण सोडवायला गेलेल्या तरुणावर सिमेंटच्या गट्टूने हल्ला

धनंजय मुंडेंना आणखी एका प्रकरणात क्लिन चीट, राज्याच्या लोकायुक्तांनी फेटाळले आरोप

Latest Marathi News Live Update : ISISशी संबंधित प्रकरणी ATSचे मुंबईत छापे

ट्रक ड्रायव्हरच्या प्रेमात पडली अभिनेत्री, लिव्ह इन पार्टनरला संपवलं; १२ दिवस घरात सडला मृतदेह, तिघांना अटक

Vijay Deverakonda: लग्नानंतर विजय देवरकोंडाचा मास्टरस्ट्रोक! तेलंगणातील ९वी अन् १०वीच्या मुलांसाठी केली स्कॉलरशिप जाहीर

SCROLL FOR NEXT