मनोरंजन

ती रडली पण बोलली... 'पोराबाळांसाठी लढता आलचं पाहिजे'

अभिनेत्री शिल्पा शेट्टीला shilpa shetty न्यायालयाकडून दिलासा काय मिळाला तिनं मुक्तपणे बोलायला सुरुवात केली आहे.

युगंधर ताजणे

मुंबई - अभिनेत्री शिल्पा शेट्टीला shilpa shetty न्यायालयाकडून दिलासा काय मिळाला तिनं मुक्तपणे बोलायला सुरुवात केली आहे. जो पर्यत राज कुंद्राच्या raj kundra जामिनावर सुनावणी होत नाही तोपर्यत काही बोलण्याचा प्रसंग शिल्पानं जाणीवपूर्वक टाळला होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून शिल्पानं आपल्या प्रतिक्रियेमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. शिल्पानं काही माध्यमांवर आपली प्रतिमा मलीन करण्याचा आरोप केला होता. त्यासाठी तिनं न्यायालयातही धाव घेतली होती. यासगळ्यात शिल्पाच्या बाजुनं बॉलीवूडमधील काही सेलिब्रेटी उभे राहिले होते. त्यात प्रसिद्ध दिग्दर्शक हंसल मेहताही होते. मात्र सो कॉल्ड प्रख्यात अभिनेते आणि अभिनेत्री यांनी त्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. माझ्या पतीच्या दोषाचे कारण मी आहे का, असा प्रश्न तिनं तेव्हा ट्रोलर्सला विचारला होता.

शिल्पाचं असं म्हणणं आहे की, महिलांनी आपल्यावरील अन्याय विनाकारण सहन करण्यात काही एक अर्थ नाही. त्यांनी लढायला शिकलं पाहिजे. रडत बसता कामा नये. त्याचा इतर अनेकजण फायदा घेतात. शिल्पानं हे सगळं आता बोलण्याचं कारण म्हणजे. आतापर्यत तीन वेळा शिल्पाच्या पतीला जामीन नाकारण्यात आला. न्यायालयानं त्यांना काही प्रमाणात दिलासा दिला आहे. त्यामुळे शिल्पा पुन्हा सुपर डान्सच्या शो मध्ये दिसली आहे. त्या कार्यक्रमामध्ये ती रडली देखील. अशाप्रकारे तिनं काही अंशी सहानुभुतीही मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचीही सोशल मीडियावर चर्चा सुरु होती.

लखनऊ पोलिसांनी शिल्पा शेट्टी आणि तिची आई यांच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. त्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी लखनऊ पोलिसांनी मुंबईमध्ये धडक मारली होती. त्यामुळे अजुनही शिल्पाची ड़ोकेदुखी काही कमी झालेली नाही. तरीही तिनं ज्यापद्धतीनं आपली मतं व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे त्याची चर्चा आहे. त्याचं झालं असं, शिल्पा तिच्या सुपर डान्स नावाच्या रियॅलिटी शो मध्ये सहभागी झाली होती. तेव्हा तिनं राणी लक्ष्मी बाई यांच्यावरील एक परफॉर्मन्स पाहिला. त्यानंतर ती भारावून गेली. ती भावूकही झाली. गेल्या काही दिवसांत तिला कोणत्या प्रसंगांना सामोरं जावं लागलं. याविषयी तिनं सांगितलं. आणि उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Switzerland Bar Explosion : नवीन वर्ष साजरं करतानाच बारमध्ये भीषण स्फोट; अनेक पर्यटक ठार; मृतांचा आकडा वाढण्याची भीती!

Satara Accident : मित्रांसोबत पार्टीसाठी गेलेला युवक 400 फूट खोल दरीत पडून गंभीर जखमी; कास पठाराच्या मार्गावर दुर्घटना

Indian Navy: नववर्षात नौदलाचे सामर्थ्य वाढणार! ‘तारागिरी’, ‘अंजदीप’ युद्धनौका लवकरच सेवेत

Latest Marathi News Live Update : स्वर्गीय आमदार लक्ष्मण जगताप यांच्या स्मारकारच देवेंद्र फडणवीस करणार लोकार्पण

Success Story Women Farmers : कोल्हापूर जिल्ह्याच्या शेतीतही महिलाराज; उद्योजकतेचा दिला साज

SCROLL FOR NEXT