मनोरंजन

आता आठवडाभर आधीच होणार 'शिमगा'

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई- मुंबई, पुण्यातील चाकरमानी, मानकरी या दरम्यान कोकणाची वाट धरतात. या वेळी भक्त गाऱ्हाणीही घालतात. एकंदरच कोकणात उत्साहाचं, जल्लोषमय वातावरण असतं. अशीच जोशपूर्ण कथा आपल्याला श्री केळमाई भवानी प्रॉडक्शन निर्मित 'शिमगा' या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

शिमगा... कोकणातील सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरेचं दर्शन घडवणारा हा सण. होळीचा सण म्हणजे घरातील सर्व वाईट जाळून टाकायचा सण. वाईट विचार या होळीच्या अग्नीत राख करून टाकावेत, अशी महती असणाऱ्या या शिमगोत्सवाची संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक माणूस एखाद्या चातकाप्रमाणे वाट पाहात असतो.

सोशल नेटवर्किंग साईटवर लाँच झालेल्या पोस्टरवरून या चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढली असतानाच आणि कोकणात शिमग्याचा उत्स्फूर्त माहौल असतानाच म्हणजेच 15 मार्च रोजी हा चित्रपट महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील गणेशवाडी येथील कोकणचे सुपुत्र निलेश कृष्णाजीराव पालांडे ऊर्फ निलेश कृष्णा दिग्दर्शित व लिखित या चित्रपटात राजेश शृंगारपुरे आणि भूषण प्रधान यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे संगीत पंकज पडघन यांचे असून गुरु ठाकूर आणि वलय यांची गीते आहेत. चित्रपटाच्या छायाचित्रीकरणाची धुरा अनिकेत खंडागळे यांनी सांभाळली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: रुपाली चाकणकरांना राजीनामा देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश; आजच निर्णय? सूत्रांची माहिती

Thane News: ठाणेकरांसाठी मोठी बातमी! २३ मार्चपासून २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार; पण कधीपर्यंत आणि कुठे? जाणून घ्या यादी...

US-Iran War : अमेरिका इराणमध्ये पाठवणार २५०० सैनिक, होर्मूज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी नवा प्लॅन

Diesel Price: मोठा झटका! पेट्रोलनंतर डिझेलही महागलं; तब्बल २२ रुपयांनी वाढ, जाणून घ्या नवे दर...

Unseasonal Rain Hits KedarKheda Region : केदारखेडा परिसरात अवकाळी पावसाचा तडाखा; गहू-हरभरा-ज्वारी पिकांचे मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT