Shiv Thakare Viral Video esakal
मनोरंजन

Shiv Thakare Viral Video : अरे बाप रे शिव ठाकरेला काय झालं, चेहऱ्यावर एवढे मोठे फोड कसे काय आले?

शिवचा तो व्हिडिओ आणि त्याच्या (Shiv Thakare Latest News) चेहऱ्यावरील मोठे फोड, डोक्यावरील टक्कल यामुळे वेगवेगळे प्रश्न चाहत्यांकडून त्याला विचारले गेले आहेत.

युगंधर ताजणे

Shiv Thakare Viral Video : बिग बॉसच्या गेल्या सीझनमध्ये विजेता म्हणून ज्याच्या नावाची सर्वाधिक चर्चा होती त्या शिव ठाकरेचा एक व्हिडिओ सध्या सोशल (Shiv Thakare Viral Video) मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. तो व्हिडिओ पाहिल्यावर त्याच्या चाहत्यांना मोठा धक्काच बसला आहे. शिवचा तो अवतार पाहून त्याला काय झाले असेल असा प्रश्न व्हिडिओ पाहणाऱ्यांना पडल्याचे त्यांच्या कमेंटवरुन दिसत आहे.

रस्त्यावर भीक मागतानाचा शिवचा तो व्हिडिओ आणि त्याच्या (Shiv Thakare Latest News) चेहऱ्यावरील मोठे फोड, डोक्यावरील टक्कल यामुळे वेगवेगळे प्रश्न चाहत्यांकडून त्याला विचारले गेले आहेत. बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात विजेतेपद मिळवणाऱ्या शिवची लोकप्रियता मोठी आहे. त्याला सोशल मीडियावर फॉलो करणाऱ्या चाहत्यांची संख्याही मोठी आहे. यापूर्वीच्या त्याच्या व्हायरल व्हिडिओ आणि फोटोंना चाहत्यांनी कमेंट दिल्या आहेत.

हिंदी आणि मराठी मनोरंजन विश्वात आपल्या नावाची वेगळी ओळख शिवनं तयार केली आहे. बिग बॉस हिंदीच्या सीझनमध्ये त्यानं विजेतेपद मिळवावं अशी त्याच्या लाखो चाहत्यांची इच्छा होती. पण त्याच्याऐवजी एमसी स्टॅनचे नाव जाहीर झाले आणि चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. आता तो पुन्हा चर्चेत आला आहे त्याचे कारण त्याचा रस्त्यावर भीक मागतानाचा व्हायरल झालेला व्हिडिओ.

शिवचा चेहरा इतका भयावह दिसतो आहे की, अनेकांना प्रश्न पडला आहे की हा नक्की शिवच आहे की दुसरा कुणी, त्यानं असं का केलं असेल....यात एका रिक्षावाल्या काकांनी त्याला पैसे दिल्याचे त्या व्हिडिओमध्ये दिसत आहे. शिवच्या त्या व्हिडिओनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कर्णधार पृथ्वी शॉ फेल, महाराष्ट्राच्या संघाला १५४ धावांचा पाठलागही जमेना! SMAT 2025 स्पर्धेत तिसरा पराभव

Crime: एक भीती अन् वडिलांची असहाय्यता... पित्यानं लेकीला अंधाऱ्या खोलीत २० वर्ष कैद केलं, हादरवणारं कारण समोर

Sangli Water Crisis : अशुद्ध पाण्याने किल्लेमच्छिंडगडचे नागरीक त्रस्त; किडनी स्टोनचा धोका वाढतोय!

IndiGo: इंडिगोचं चाललंय काय? 300 पेक्षा जास्त विमानं रद्द; DGCA पासून मंत्रालयापर्यंत बैठकांचा धडाका, आतापर्यंतचे सर्व अपडेट्स

Latest Marathi News Live Update : गुन्हा दाखल करण्याची धमकी देत मागितली दोन लाखांची खंडणी

SCROLL FOR NEXT