Khatron Ke Khiladi 13 Elimination:  Esakal
मनोरंजन

Khatron Ke Khiladi 13 Elimination: खतरों के खिलाडी मधुन मराठमोळ्या शिवचा पत्ता झाला कट मात्र..

Vaishali Patil

Khatron Ke Khiladi 13 Elimination: लोकप्रिय रिअॅलिटी शो 'खतरों के खिलाडी सीझन 13' सध्या सुरु आहे.रोहित शेट्टीच्या स्टंट आधारित या शो ला आता एक महिना झाला आहे.

या शोमध्ये आत्तापर्यंत चार लोक एलिमिनेट झाले आहेत. त्यात रुही चतुर्वेदी, अंजुम फकीह आणि अंजली आनंद यांचा सामावेश आहे. या सीझनमध्ये 14 सेलेब्स यांनी स्पर्धक म्हणून चांगलीच टक्कर दिली आहे. आता 'खतरों के खिलाडी 13' चा शेवटचा एपिसोड पाहिल्यानंतर प्रेक्षकांची थोडी निराशा झाली आहे.

खतरों के खिलाडी 13 मध्ये, या आठवड्यात एलिमिनेशनसह स्पर्धकाची वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे. KKK 13 च्या अलीकडील एपिसोडमध्ये, होस्ट रोहित शेट्टी स्वतः स्पर्धकांच्या विरोधात आला. यावेळी खतरों के खिलाडी 13 मध्ये रोहित शेट्टी आणि स्पर्धकांमध्ये स्पर्धा पाहायला मिळाली.

या खेळात शेवटी खेळाडूंना फक्त 5 स्टार आहेत आणि रोहितला 6 स्टार मिळेले. अशा परिस्थितीत ऐश्वर्या आणि शिव ठाकरे हे दोघं एलिमिनेशन राऊंडमध्ये अडकले.

त्यानंतर दोघांमध्ये एक स्टंट करण्यात आला ज्यात त्यांना विज आणि साप-विंचू मधून चावी शोधायची होती आणि साखळीला लटकलेले कुलूप उघडून त्यांना बाहेर यायचे होते.

यावेळी दोघांनी ही चांगलं काम केलं मात्र या टास्क शिवाला 11 मिनिटे 46 सेकंद लागले आणि ऐश्वर्याला ते पूर्ण करण्यासाठी 10 मिनिटे 3 सेकंद लागले.

यासोबत खतरों के खिलाडी 13 मधील शिवचा प्रवास संपला असं बोललं जात आहे. त्यानंतर शिवच्या चाहत्यांची निराशा झाली होती. मात्र या आठवड्यात शोमध्ये नॉन-एलिमिनेशन आठवडा असल्यानं शिव ठाकरे सुरक्षित आहे आणि तो शो मधुन निघालेला नाही.

बिग बॉस 16 चा उपविजेता असेलला शिव KKK 13 ची ट्रॉफी नक्कीच घरी घेवुन जाईल अशी आशा त्याच्या चाहत्यांना आहे. त्यात आता शिव घरातुन जाणार की त्याचा गेम पुर्ण करणार हे येणाऱ्या काही भागांमध्ये पहावे लागले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant: मठात परतल्यानंतर फटाके, गर्दी अन् हॉर्नचा सामना... माधुरी पुन्हा वनतारामध्ये जाणार? PETA ची सर्वोच्च न्यायालयात याचिका!

Latest Marathi News Live Update : 'अद्वितीय धैर्याबद्दल मी त्यांना सलाम करतो'; इस्रायलच्या पंतप्रधानांकडून कॅप्टन स्मित मच्छार यांचं कौतुक

Pune ACB Trap : 'वर्दी'ला पुन्हा कलंक! शिरूरमध्ये 95 हजारांची लाच घेताना हवालदार जाळ्यात; गुन्ह्यात अटक न करण्यासाठी मागत होता 1 लाख

IND vs SL Semi Final : भारताला दिवसा 'चांदण्या' दिसल्या! ९ फलंदाज घेऊन उतरले, पण इशान किशन, वैभव सूर्यवंशीमुळे वाचली लाज

'आपको बाहर जाना पड़ेगा...' मुश्ताक खान यांच्या शोकसभेतून राजपाल यादवांना हकललं? Viral Video

SCROLL FOR NEXT