shiv thakare Sakal
मनोरंजन

Khatron Ke Khiladi 13: शिव ठाकरेची धमाकेदार एंट्री...स्टारची फी जाणून व्हाल थक्क!

'बिग बॉस 16' शोनंतर प्रसिद्धीझोतात आलेला शिव ठाकरे 'खतरों के खिलाडी'च्या एका एपिसोडसाठी घेणार बक्कळ मानधन...

Aishwarya Musale

खतरों के खिलाडी 13 लवकरच सुरू होणार आहे. बिग बॉस 16 नंतर प्रेक्षक रोहित शेट्टीच्या स्टंटवर आधारित शोची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशा परिस्थितीत खतरों के खिलाडी 13 च्या स्पर्धकांबाबत जोरदार चर्चा रंगली आहे. आता निश्चित झालेल्या स्पर्धकांची नावेही समोर येत आहेत.

बिग बॉस 16 चा स्टार शिव ठाकरे त्यापैकीच एक आहे. त्याने स्वत: खतरों के खिलाडी 13 मध्ये त्याच्या सहभागाची पुष्टी केली आणि खुलासा केला की तो याबद्दल खूप उत्साहित आहे. आता शिव ठाकरेंचे नाव आणखी एका कारणाने चर्चेत आहे. शिव ठाकरे नवीन हंगामातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या स्पर्धकांपैकी एक असल्याचे वृत्त आहे.

शिव ठाकरे खतरों के खिलाडी या शोसाठी सज्ज झाला आहे. अशा परिस्थितीत शिव रोहित शेट्टीच्या शोमधील एका एपिसोडसाठी लाखो रुपये घेत असल्याची बातमी आली आहे. रिपोर्टनुसार, शिव एका एपिसोडचे शिव ठाकरे 5 ते 8 लाख रुपये घेणार आहे. अशा परिस्थितीत, असे म्हणता येईल की बिग बॉसचा हा स्टार शोमधून दर आठवड्याला 10 ते 16 लाख रुपये घेणार.

खतरों के खिलाडी या शोमध्ये आणखी अनेक सेलिब्रिटींची नावे समोर आली होती, त्यापैकी आणखी दोन टीव्ही सेलिब्रिटींची नावे फायनल झाली आहेत. या सेलिब्रिटी टीव्हीच्या प्रसिद्ध सून आहेत. कुंडली भाग्य अभिनेत्री अंजुम फकीह आणि रुही चतुर्वेदी शोमध्ये धोकादायक स्टंट करताना दिसणार आहेत.

खतरों के खिलाडी या शोमध्ये अभिनेता करण टेकर आणि एरिका फर्नांडिस यांचीही नावे समोर आली आहेत. करण शोमध्ये येणार की नाही हे माहीत नसले तरी एरिकाने नुकतेच एका मुलाखतीत सांगितले की, 'खतरों के खिलाडी' शोच्या आधीपासून तिला ऑफर्स येत आहेत. यावेळी तिला शोमध्ये रस आहे. तिला संधी मिळाली तर ती नक्कीच शोमध्ये येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Japan first female Prime Minister : जपान रचणार इतिहास! देशाला मिळणार पहिल्या महिला पंतप्रधान; जाणून घ्या, कोण आहेत साने ताकाइची?

व्ही शांताराम यांची उलटीही त्यांनी हातात घेतली... संध्या यांच्याबद्दल सावत्र मुलीने केलेले मोठे खुलासे; म्हणाली, 'त्यांच्यासारखी बाईच...

Government schemes : सरकारी योजनांची साथ आणि उद्योजकीय स्वप्ने; एका महिलेची प्रेरणादायी कहाणी

Sameer Bhujbal : शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार! मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर समीर भुजबळांकडून येवल्यात मदतीचा दिलासा

"म्हणून व्हेंटिलेटर’ लिहायला मला ४८ वर्ष लागली! " वॉटरफ्रंट इंडी फिल्म फेस्टिव्हल मध्ये राजेश मापुस्करांचा खुलासा

SCROLL FOR NEXT