shiv thakare finalist in Khatron Ke Khiladi 13 KKK 13 after bigg boss  SAKAL
मनोरंजन

KKK 13 Shiv Thakare: वाघ खतरो के खिलाडीमध्येही गरजला! मराठमोळा शिव झाला पहिला फायनलिस्ट

खतरो के खिलाडी शोच्या १३ व्या सिझनची ऑफर मिळाली आणि शिवने तिथेही स्वतःचं अस्तित्व गाजवलंय.

Devendra Jadhav

Shiv Thakare KKK 13 Finalist News: मराठमोळा शिव ठाकरेने बिग बॉस गाजवलं हे आपल्याला माहीतच आहे. शिव ठाकरेने बिग बॉस १६ चं उपविजेतेपद पटकावलं. MC Stan जरी बिग बॉस १६ चा विजेता झाला असला तरीही मराठमोळ्या शिव ठाकरेने बिग बॉस १६ खऱ्या अर्थाने गाजवलं.

अगदी सलमान खानने सुद्धा त्याचं कौतुक झालं. याच शिवला बिग बॉसनंतर खतरो के खिलाडी शोच्या १३ व्या सिझनची ऑफर मिळाली आणि शिवने तिथेही स्वतःचं अस्तित्व गाजवलंय.

(shiv thakare finalist in Khatron Ke Khiladi 13 KKK 13 after bigg boss)

खतरों के खिलाडी 13 चे 60% पेक्षा जास्त शूटिंग पूर्ण झाले आहे. जुलैमध्ये कलर्स टीव्हीवर या शोचा प्रीमियर होणार आहे. खतरों के खिलाडी 13 मध्ये स्पर्धकांनी आतापर्यंत जीवाची बाजी लावून स्टंट केलेत.

काहींचा प्रवास अर्ध्यतच संपला. आजवर अनेक स्पर्धकांना दुखापत झाली. रोहित रॉय सारख्या काही स्पर्धकांनी आतापर्यंत माघार घेतली आहे.

शोमध्ये एकामागून एक जीवघेण्या खेळांमधून आजवर ८ स्पर्धक फायनलमध्ये पोहोचले आहेत. या फायनलमध्ये पोहोचणाऱ्या स्पर्धकांमध्ये शिव ठाकरे आहे.

शिवने दमदार खेळाने खतरों के खिलाडी 13 च्या अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे. उत्कंठावर्धक स्टंटमधील शिवच्या चमकदार कामगिरीने त्याला खतरों के खिलाडी 13 च्या अंतिम फेरीत स्थान मिळवून दिलंय.

ग्रँड फिनालेची तयारी जोरात

बिग बॉस 16 च्या वेळेपासून शिवला खतरों के खिलाडी 13 मध्ये जायचे होते. पुढे बिग बॉसच्या घरात असतानाच रोहित शेट्टीने शिवला खतरों के खिलाडी 13 ची ऑफर दिली.

शिवने सुद्धा बिग बॉस १६ नंतर लगेचच खतरों के खिलाडी 13 ची तयारी जोमाने सुरू केली. मेहनतीला यश मिळतंच.

शिव सर्वांना मागे सारत खतरों के खिलाडी 13 चा फायनलमध्ये गेला असून तो विजेतेपदाचा मुख्य दावेदार मानला जातोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

IND vs ENG 2nd Test: Ohhh NO! शुभमन गिलच्या डोक्यावर चेंडू जोरात आदळला, डॉक्टरांची मैदानावर धाव अन्...

VIRAL VIDEO: यांना 'महाराष्ट्र केसरी' म्हणावं की दुसरं काही! दोन घोरपडीमध्ये रंगली दंगल, व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल

Alternative Careers: 9 ते 5 च्या ठराविक नोकरीला कंटाळला आहात? मग 'हे' 8 करिअर पर्याय तुमच्यासाठी ठरू शकतात योग्य पर्याय!

Viral: पैसे उधार घेणाऱ्यांनो लक्ष द्या...! उसने घेतलेली रक्कम वेळेत परत केली नाही तर होणार जेल अन्..., न्यायालयाचा निर्णय

SCROLL FOR NEXT