Shiv Thakare Daisy Shah Relationship Esakal
मनोरंजन

Shiv Thakare: काहीतरी शिजतंय! शिव अन् डेझीचं जुळतंय?

शिव ठाकरे आणि डेझी शाह यांचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

Vaishali Patil

Shiv Thakare Daisy Shah Relationship Rumours : मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वाचा विजेता शिव ठाकरे याने केवळ मराठीच नव्हे तर हिदी विश्वातही आपली छाप सोडली आहे.

तो बिग बॉस हिंदी आणि खतरों के खिलाडी या शोमध्ये दिसला. हिंदी बिग बॉसमुळे तो खुप चर्चेत आला होता. तो बिग बॉसचा सिझन जिंकू शकला नाही मात्र त्याने चाहत्यांची मनं मात्र नक्कीच जिकंली.

आता तो खतरों के खिलाडी या शोमुळे चर्चेत आहे. शिव ठाकरेचा यंदाचा सिझन जिंकणार असा विश्वास त्याच्या चाहत्यांना आहे.

मात्र कामाव्यतिरिक्त तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खुप लाईमलाईटमध्ये आला आहे. सध्या त्याच नाव एका अभिनेत्रीसोबत जोडलं जात आहे. दोघांच्या डेटिंगच्या अफवाही खुप सुरु आहेत.

शिव ठाकरेसोबत ज्या अभिनेत्रींचं नाव जोडलं जात आहे ती अभिनेत्री आहे बॉलिवूडमध्ये भाईजानसोबत काम केलेली डेझी शाह. शिव आणि डेझी यांची जोडी सोशल मिडियावर चर्चेत आहे. दोघांचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत.

हे दोघंही अनेकवेळा एकत्र स्पॉट होत आहेत. कधी डिनर डेटवर तर कधी मुव्ही डेटवर.. नुकतच दोघांनी रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा स्टारर वेड चित्रपटातील 'वेड लावलयं' या गाण्यावर भन्नाट डान्स देखील केला.

खतरों के खिलाडी या शोमध्ये दोघांनी एकत्र काम केलं आहे. या शोच्या सेटवर त्यांची मैत्री झाली. शोचे शूटिंग संपल्यानंतरही शिव आणि डेजी एकत्र स्पॉट होत आहेत.

काल रात्री देखील मोहित मलिक आणि त्याची पत्नी अदितीच्या रेस्टॉरंट लॉन्चमध्ये डेझी आणि शिव दोघेही एकत्र दिसले. दोघेही या कार्यक्रमात वेगवेगळे आले मात्र त्यानंतर दोघेही कारमध्ये एकत्र दिसले.

जेव्हा पापाराझींनी त्यांना चिडवले की, दोघांची जोडी चांगली दिसत आहे आणि दोघांनीही मित्र राहिले पाहिजे. त्यावर शिव ठाकरे देखील म्हणतो की त्याची इच्छा शिवच्या हृदयापर्यंत पोहोचत आहे.

आता हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर चाहत्यांच्या कमेंट्सही येत आहेत. एकाने लिहिले आहे की, "दोघांमधील बॉन्ड खूप क्यूट आहे.तर दुसऱ्याने लिहिलयं "जोडी हिट आहे." तर काहींना दोघांना एकत्र चित्रपट, वेब सिरीजमध्ये पहायची इच्छा व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मृत्यू डोळ्यासमोर, पण घाबरला नाही; १० जणांचा जीव घेणाऱ्या हल्लेखोराची बंदूक हिसकावली अन्...; धाडसी हिरोचं शौर्य व्हिडिओत कैद

Latest Marathi News Live Update: वानखेडे स्टेडियमवर 'प्रोजेक्ट महादेवा' चा शुभारंभ, लिओनेल मेस्सीची उपस्थिती

Mumbai Railway Station: दादर स्‍थानकावर नवी मार्गिका; प्लॅटफॉर्म ८ लवकरच सुरू होणार; गाड्यांची संख्याही वाढणार

Yoga for Women: महिलांनी घरकामाला व्यायाम समजणं चुकीचे; रोजच्या जीवनात 'या' सोप्या योग पद्धतीचा सराव करा

Winter Session 2025: नवख्या आमदारावर Devendra Fadanvis भयंकर चिडले, बघा काय म्हणाले? | Sakal News

SCROLL FOR NEXT