Shiv Thakare sister Manisha called insecure to priyanka chahar and big boss updates Instagram
मनोरंजन

Bigg Boss 16: शिव ठाकरेची बहिण मनिषा ठाकरे अचानक चर्चेत, बिग बॉसवर भडकत म्हणालीय,'नेहमीच काय...'

मराठमोळा शिव ठाकरे सध्या ज्या पद्धतीनं 'बिग बॉस १६' मध्ये गेम खेळताना दिसत आहे त्यामुळे हिंदी भाषिक प्रेक्षकांमध्येही त्याची चर्चा रंगू लागली आहे.

प्रणाली मोरे

Bigg Boss 16: गेल्या काही दिवसात बिग बॉस (हिंदी) च्या घरात खूप काही गोष्टी घडल्या आहेत. सुरुवातीला अर्चना गौतम आणि शिव ठाकरेचं भांडण आणि आता एमसी स्टॅन तसंच शालिन भनोटचं भांडण. सगळ्या भांडणात कॉमन होती प्रियंका चाहर चौधरी.

सुरुवातीला तिनं अर्चनाला साथ दिली होती आणि आता शालीन भनोटच्या बाजूनं बोलताना दिसतेय. यासाठी तिला खूप सुनावलं देखील गेलं. इतकंच नाही तर बिग बॉसनं देखील फटकारलं होतं. आता मराठी बिग बॉस २ विनर शिव ठाकरेची बहिण मनीषा ठाकरेनं मीडियाशी बातचीत करताना प्रियंकाला ती इनसिक्योर असल्याचं म्हटलं आहे.(Shiv Thakare sister Manisha called insecure to priyanka chahar and big boss updates)

त्याचं झालं असं की, जेव्हा अर्चना गौतम आणि शिव ठाकरेचं भांडण झालं होतं तेव्हा सलमान खानने शिवची शाळा घेतली होती. तो म्हणाला होतो, शिवने पूर्ण प्लॅनिंग करुन अर्चनाला छेडलं होतं. अन् घराच्या बाहेर जाण्यास प्रवृत्त केलं होतं. त्यानंतर पुन्हा अर्चनाला बिग बॉसच्या घरात आणलं गेलं होतं.

आता शिव ठाकरेच्या बहिणीनं एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे,''ज्या पद्धतीन शिवचा मुद्दा उगाचच मोठा केला गेला,त्याने आम्ही थोडे दुःखी झालो आहोत. पूर्ण गेम एकमेकांना भडकवण्याचा आहे. सलमान खानचं म्हणणं आहे बिग बॉसच्या घरात उगाच बाहेरच्या मुद्द्यांना घेऊन बोललं नाही पाहिजे. आणि यानंतर शीवने देखील आपली चूक मान्य केली होती.''

''शालिन आणि शीव मध्ये खोलीच्या आत जे बोलणं झालं,त्यात शालीनं माझ्या भावाला म्हणाला केवळ शीव अर्चनाला चूप करू शकतो,कारण त्याला तिची नस कळाली आहे. शिवनं तिला मजेमजेत छेडलं होतं ना की कुठल्या चुकीच्या हेतूने''.

शीवची बहिण मनिषा पुढे म्हणाली,''भांडणा दरम्यान बोललं गेलं की शिवने अर्चनाचा हातही पकडला. क्लीप पाहिल्यावर कळत आहे की तो आपला हात सोडवायचा प्रयत्न करत आहे. त्याने धक्काही दिला नाही,यावर कोणाचं काहीच म्हणणं नाही. ते का दुर्लक्षित केलं जात आहे?''

मनीषाचं म्हणणं आहे की, ''मला या गोष्टीवर विश्वास आहे की ज्यापद्धतीनं अर्चनाला शारिरीक हिंसेनंतर पुन्हा घरात घेतलं गेलं तशी संधी शिवला किंवा इतर कोणाला मिळेल का किंवा मिळाली असती का? ती चांगली खेळतेय, शो ला कंटेट देतेय म्हणून सारं केलं,आम्हाला याचा काहीच प्रॉब्लेम नाही की तिनं पुन्हा घरात एन्ट्री केलीय''.

''जेव्हा ती जाताना बिग बॉसला आणि शिवला घरात राहू देण्याची विनंती करत होती तेव्हा तर शिवनं तिला जवळपास माफ करून टाकलं होतं. त्याला माहित होतं घरातील सगळे आपल्या बाजूने आहेत पण अर्चनाची तो गॅरंटी देऊ शकत नव्हता. मला माहितीय अर्चनाने जाणून-बुजून असं केलं नसेल,पण शिववर उगाचच तिला बेघर केल्याचा ठप्पा पाडला गेला''.

हेही वाचा: महापाषाणयुगीन दगडी स्मारकामध्ये दडल्या आहे समृद्ध संस्कृतीच्या खुणा....

मनिषानं आपल्या भावाच्या खेळाची प्रशंसा केली. म्हणाली'',तो चांगला खेळतोय. जिथे गरज आहे तिथे योग्य निर्णय घेताना दिसत आहे. आणि जेव्हा अडचण येतेय तो चांगला सामना करतोय. मराठी बिग बॉस मधला अनुभव तो इथे चांगला कामी आणतोय''.

''बिग बॉस साजिद खान, शिव ठाकरे, अब्दु रोझिक आणि एमसी स्टॅंड,निमृत कौर अहलूवालियाला पाठिंबा देत आहे या गोष्टीला तिनं 'अफवा' म्हटलं. शिव एक चांगला लीडर आहे,तो सगळ्यांचा विचार करतो आणि याच त्याच्या ईमानी स्वभावामुळे सगळे त्याला पाठिंबा देताना दिसतात''.

मनिषानं पुढे प्रियंका विषयी बोलताना म्हटलं, ''नेहमी शिवनं प्लॅनिंग केल्याचं म्हटलं जातं. साजिद खानच्या कॅप्टनशीप विषयी असो किंवा आणखी इतर कशाविषयी..प्रत्येकानं म्हटलं की आम्ही आमच्या डोक्याने खेळतोय''.

''प्रत्येक वेळेला शिवचं कुणी ऐकत नाही, ते स्पष्ट दिसतंय. प्रियंकाला वाटतं ती स्ट्रॉंग आहे. मला वाटतं ती शिव पेक्षा अधिक इनसिक्योर आहे. तिच्या डोक्यात शिव विरोधात काहीतरी कटकारस्थान शिजत असतं असं कायम वाटतं कारण ती प्रत्येक गोष्टीसाठी शिवला जबाबदार ठरवते''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Iran Conflict : डोनाल्ड ट्रम्प नरमले पण इराण युद्ध थांबवणार नाही, सांगितले 'हे' मोठे कारण

Satara Bribery Case: गुण नियंत्रण अधिकारी लाच घेताना ताब्‍यात; सातारा तालुक्यात खळबळ, खत तपासणीसाठी ५० हजारांची लाच, सापळा रचला अन्..

मुख्यमंत्री तिर्थदर्शन योजना बंद! 2 वर्षे झाले अर्ज करून सोलापुरातील 600 ज्येष्ठ नागरिकांना मिळेना ‘तीर्थदर्शन’; शेवटची इच्छा अपूर्णच, वाचा...

मोठी बातमी! आता प्रत्येक शिक्षकाचे स्वतंत्र प्रोफाईल तयार होणार; माध्यमिक शिक्षण विभागाचा निर्णय; एका क्लिकवर मिळणार ३ लाख शिक्षकांचा बायोडाटा

Panchang 24 March 2026: आजच्या दिवशी ऋणमोचक मंगळ स्तोत्राचे पठण आणि ‘अं अंगारकाय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT