shivali parab, maharashtrachi hasyajatra, shivali parab photoshoot SAKAL
मनोरंजन

World Laughter Day: लोकलमधली धक्काबुक्की आणि फोनवर हास्यजत्रा.. 'लाफ्टर डे' निमित्त शिवालीने सांगितला खास किस्सा

आज असलेल्या वर्ल्ड लाफ्टर डे निमित्ताने शिवालीने सगळ्यांना वर्ल्ड लाफ्टर डेच्या देताना खास संदेश दिलाय.

Devendra Jadhav

Shivali parab Maharashtrachi Hasyajatra News: महाराष्ट्राची हास्यजत्रा हा शो सगळ्यांच्या आवडीचा आहे. याच शो मधील सगळ्यांची लाडकी अभिनेत्री म्हणजे शिवाली परब. अत्यंत कमी वयात कॉमेडी क्विन अशी ओळख मिळवलेली अभिनेत्री म्हणजे शिवाली दीपक परब. शिवालीचा आजवरचा प्रवास, हास्य जत्रेतील गमतीजमती आणि काही खास किस्से तिने सकाळ Unplugged मध्ये बोलताना सांगितले. याच सकाळ Unplugged मध्ये आज असलेल्या वर्ल्ड लाफ्टर डे निमित्ताने शिवालीने सगळ्यांना वर्ल्ड लाफ्टर डेच्या देताना खास संदेश दिलाय.

(Shivali parab told a special message on the occasion of world Laughter Day)

शिवाली म्हणते... "सगळ्यात आधी सगळ्यांना वर्ल्ड लाफ्टर डे च्या खूप शुभेच्छा देईल मी. टीव्ही वर बघून हसणं वैगरे आहेच. पण खरंतर मला खूप प्रतिक्रिया येतात की, तुमच्यामुळे आम्ही कामावरून आल्यावर कामाची जी दगदग असते ट्रेनमधून जे ट्रॅव्हल असतं. धक्काबुक्की असते. चिडचिड असते, त्यावेळी झोपताना आम्ही तुमचा शो बघतो आणि हसत हसत झोपतो. हे आम्हाला मिळालेलं सगळ्यात जास्त चांगलं कौतुक आहे .. त्यामुळे हास्यजत्रेतील आम्ही सर्व कलाकार हे खिलाडूवृत्तीने घेतो आणि सगळ्यांना प्रयत्न करत असतो हसविण्याचा.

शिवाली परब पुढे म्हणते.. "मी सगळ्यांना हेच सांगेल की, मी कधीच विचार नव्हता केला की मी लोकांना हसवू शकते. पण इथे आल्यावर ही सुवर्णसंधी मला मिळाली. कारण हसवणं खूप कठीण आहे आणि रडवणं फार सोप्प आहे. आणि मी सगळ्यांना हेच सांगेल हास्यजत्रा हा शो सोनी मराठीवर रात्री 9 वाजता लागतो. यू ट्यूब वर खूप स्कीट उपलब्ध आहोत .. हातात मोबाईल असतो. दोन क्षण हसणं एन्जॉय कारा आणि रात्री झोपा. पण हास्यजत्रा बघा कारण आमचं ते काम आहे."

शिवाली शेवटी म्हणते.. "तुम्ही आम्हाला तेव्हढंच बघून हसता. पण आम्ही continue त्याच प्रोसेस मध्ये असतो. त्यामुळे सतत आम्ही हसत असतो. सतत विनोद आणि त्या गोष्टी होतच असतात. त्यामुळे आमचं लाईफ खूप हॅपी आहे. त्यामुळे खूप भारी वाटतं. त्यामुळे सगळ्यांना हेच सांगेल की प्लीज हसत राहा. आणि फक्त हसतच सगळ्या गोष्टी sort out कारा. आणि हसतच आयुष्य जागा. खूप शुभेच्छा."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian student shot in USA : अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या!

Rohit Sharma: 'अद्भूत कर्णधार, टीम इंडियाला तू शिकवलंस की...' दिनेश कार्तिकचा रोहितच्या नेतृत्वाला सलाम; पाहा Video

30th Fenesta Open Tennis: महाराष्ट्राच्या वैष्णवी अडकरने जिंकले विजेतेपद; मनिष सुरेशकुमार पुरुष विभागात विजेता

सातारा अन् पालघर जिल्ह्यातील दोन न्यायाधीश सेवेतून बडतर्फ; नेमकं प्रकरण काय?

Phulambri Protest : शेतकऱ्यांच्या मदतीवरून काँग्रेस आक्रमक तहसीलदार व काँग्रेस कार्यकर्त्यांत बाचाबाची

SCROLL FOR NEXT