Shivani Surve after wedding post shivani surve insta
मनोरंजन

Shivani Surve Wedding Post : 'शिवानी' अन् 'अजिंक्य'चं लग्न म्हटल्यावर चर्चा तर होणारच, इंस्टावरील नव्या पोस्टनं वेधलं लक्ष!

मराठमोळी अभिनेत्री शिवानी आणि अजिंक्य ननावरेचं लग्न मोठ्या उत्साहात पार पडलं अन् सोशल मीडियावर विविध प्रतिक्रियांना उधाण आल्याचे दिसून आले.

युगंधर ताजणे

Shivani Surve after wedding post : मराठमोळी अभिनेत्री शिवानी आणि अजिंक्य ननावरेचं लग्न मोठ्या उत्साहात पार पडलं अन् सोशल मीडियावर विविध प्रतिक्रियांना उधाण आल्याचे दिसून आले. दोन्ही प्रसिद्ध सेलिब्रेटींच्या लग्नाच्या फोटोंना चाहत्यांचा मिळालेला प्रतिसादही मोठा आहे. या सगळ्यात आता शिवानीच्या पोस्टनं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

बऱ्याच दिवसांपासून मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अभिनेता अजिंक्य ननावरे यांच्या शुभमंगल सावधानची चर्चा होती. काल मोठ्या धुमधडाक्यात हा लग्नसोहळा पार पडला. त्याला मराठी चित्रपट विश्वातील अनेक सेलिब्रेटी उपस्थित होते. सोशल मीडियावर त्या सोहळ्याचे फोटो व्हायरल झाले आहे. त्यात शिवानीच्या इंस्टावरील पोस्टनं चाहत्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

शिवानीनं अजिंक्यसोबतचा फोटो शेयर करुन त्यावर 'The stars finally aligned' अशी कॅप्शन लिहिली आहे. त्यानंतर चाहत्यांनी, नेटकऱ्यांनी शिवानीला तिच्या भावी वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तिचं कौतुक केलं आहे. मराठी मनोरंजन विश्वात आपल्या हटके स्टाईल आणि अभिनयामुळे शिवानी नेहमीच चर्चेत राहिली आहे. यापूर्वी तिच्या साखरपुड्याच्या फोटोंना चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

शिवानीच्या साखरपुड्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होती. शिवानीचा (Shivani Latest Marathi News) चाहतावर्ग मोठा आहे. तिला इंस्टावर फॉलो करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. अशावेळी आपल्या आवडत्या सेलिब्रेटीचं लग्न होत आहे याची चाहत्यांना मोठी उत्सुकता होती. यापूर्वी शिवानीच्या व्हायरल झालेल्या फोटोंना आणि व्हिडिओला (Shivani Wedding News) चाहत्यांची मोठी पसंती मिळाली होती.

गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या लग्नाबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरु होत्या. शिवानी आणि अजिंक्य विषयी बोलायचे झाल्यास 'तू जीवाला गुंतवावे' या मालिकेच्या सेटवर त्यांची ओळख झाली होती. त्यांच्या मैत्रीचं रुपांतर पुढे प्रेमात झालं. काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG, 2nd T20I: रवी बिश्नोईची 'ती' चूक महागात पडली! जेकब बेथलच्या आक्रमणामुळे भारताविरुद्ध इंग्लंडचा ऐतिहासिक विजय

IND vs ENG, 2nd T20I: अक्षर पटेलने इंग्लंडच्या कॅप्टनला आऊट करत घडवला इतिहास; यापूर्वी कोणत्याही भारतीय फिरकीपटूला जमलं नव्हतं!

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

SCROLL FOR NEXT