Shivpratap Garudjhep marathi movie now on TFS play OTT platform sakal
मनोरंजन

Shivpratap Garudjhep: 'शिवप्रताप गरुडझेप' आता ओटीटीवर..

ओटीटीवर घुमणार शिवप्रताप गरुडझेपची गर्जना..

नीलेश अडसूळ

Shivpratap Garudjhep: मनोरंजन विश्वात ओटीटीने विशेष स्थान निर्माण केले आहे. ओटीटीवर (OTT) प्रदर्शित होणार्‍या चित्रपट आणि वेब सिरिजची प्रेक्षक आतुरतेने वाट पहात असतात. मनोरंजनाच्या या नव्या रुजणार्‍या व्यासपीठावर अधिराज्य गाजवण्यासाठी अनेकजण उत्सुक असतात. विजयादशमीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या डॉ.अमोल कोल्हे यांच्या ‘शिवप्रताप गरुडझेप’ या मराठी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपल्या यशाची पताका फडकवली. बॉक्स ऑफिसवर प्रेक्षक पसंतीची जोरदार पावती मिळवल्यानंतर आता ‘टीएफएस प्ले’ (TFS PLAY ) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘शिवप्रताप गरुडझेप’ चित्रपटाची गर्जना घुमणार आहे.

(Shivpratap Garudjhep marathi movie now on TFS play OTT platform)

४ नोव्हेंबरला या चित्रपटाचा वर्ल्ड वाईड ओटीटी प्रिमियर ‘टीएफएस प्ले’ (TFS PLAY) या अॅपवर रंगला . ‘टीएफएस प्ले’ फ्री डाऊनलोड ॲप असून या ॲपवर अवघ्या ९९ रूपयांत आपल्याला हा चित्रपट पाहता येईल.

या प्रदर्शनाबाबत डॉ अमोल कोल्हे सांगतात की, आमच्यासाठी ही अतिशय आनंदाची बाब आहे. मोठया पडद्यानंतर ओटीटीवर 'शिवप्रताप गरुडझेप' चित्रपट प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. प्रत्येक माध्यमाची स्वतःची ताकद आणि ओळख आहे. ओटीटीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा देदिप्यमान इतिहास जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहचेल हे आमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे.

'जगदंब क्रिएशन्स'ची निर्मिती असलेल्या ‘शिवप्रताप गरुडझेप’ चित्रपटाचे दिग्दर्शन कार्तिक राजाराम केंढे यांनी केले असून चित्रपटात डॉ. अमोल कोल्हे यांच्यासोबत यतीन कार्येकर, प्रतीक्षा लोणकर, हरक अमोल भारतीया, शैलेश दातार, हरीश दुधाडे, मनवा नाईक, पल्लवी वैद्य, अजय तपकिरे, रमेश रोकडे, अलका बडोला कौशल, आदी ईराणी, विश्वजीत फडते आदी कलाकारांच्या भूमिका आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NHAI-Jio safety alert system: ‘हायवे’वरील धोक्यांचा इशारा आता मोबाइलवर आधीच कळणार ; 'NHAI-Jio' मध्ये करार!

मैदानी चाचणी फेब्रुवारीपासून! पोलिस भरतीत एका पदासाठी ८३ उमेदवार; इच्छुकांना रविवारपर्यंत करता येईल अर्ज; १५,६३१ पदांची भरती

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत सरकारचं मोठं विधान; कर्मचाऱ्यांची 'ही' मागणी फेटाळून लावली

Pune Voter List : मतदार यादीवर हरकत नोंदविण्यासाठी आज शेवटचा दिवस; हरकतींची संख्या १२ हजाराच्या वर!

Ahilyanagar Leopard Attack : बिबट्याच्या अचानक हल्ल्याने भागूबाई खोडदे यांचा बळी; पारनेर तालुक्यात भीतीचं वातावरण!

SCROLL FOR NEXT