shivrayancha chhava marathi movie teaser 2 out now chinmay mandlekar bhushan patil  SAKAL
मनोरंजन

Shivrayancha Chhava Teaser 2: सिंहासनावर तुमच्याआधी रयतेचा अधिकार... 'शिवरायांचा छावा'चा नवा टिझर

'शिवरायांचा छावा'चा नवीन टिझर भेटीला आलाय

Devendra Jadhav

Shivrayancha Chhava Teaser 2: दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित 'शिवरायांचा छावा' सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. या सिनेमात संभाजी महाराजांची जीवनगाथा बघायला मिळणार आहे.

काही दिवसांपुर्वी 'शिवरायांचा छावा' सिनेमातील राज्याभिषेक गीत लोकांच्या भेटीला आलं. या गीताला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला.

आज नुकतंच सर्वांच्या भेटीला 'शिवरायांचा छावा' सिनेमाचा दुसरा टिझर भेटीला आला आहे. या टिझरमध्ये शिवराय शंभूबाळाला सिंहासनाचं महत्व सांगत आहेत.

'शिवरायांचा छावा'चा नवा टिझर

दिग्पाल लांजेकर दिग्दर्शिक 'शिवरायांचा छावा' सिनेमाचा टिझर भेटीला आलाय. या टिझरमध्ये छत्रपती शिवराय शंभूराजेंना सिंहासनाकडे बघून काय वाटतं असं विचारतात? त्यावेळी शंभूराजे म्हणतात, मान अदबीने खाली झुकते.

पुढे शिवराय शंभूला निक्षून सांगतात, या सिंहासनावर आपल्याआधी रयतेचा अधिकार. पुढे टिझरमध्ये शंभूराजांचा पराक्रमाची कहाणी उलगडते.

संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकांचं गाणं

सूर्याच्या तप्त आभाळी, ही गरुडाची रे झेप, जाहला बघा संपूर्ण, नृप शंभूंचा अभिषेक अशा ओळी असलेलं हे गाणं भेटीला आलंय. या गाण्यात सिंहासनावर बसलेले शंभूराजे दिसत आहेत. त्यांच्यासमोर मावळमुलुखातील अनेक लोकं शंभूराजांचं गुणगान गाताना दिसत आहेत.

याच गाण्यात एक भावूक प्रसंग बघायला मिळतो. जेव्हा छत्रपती शंभूराजांना राज्याभिषेकाच्या वेळी शिवराय आणि जिजाऊ यांचा भास होतो.

या तारखेला येणार शिवरायांचा छावा भेटीला

'शिवरायांचा छावा' चित्रपटात अभिनेता भूषण पाटील छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत आगे. याशिवाय सिनेमात छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत चिन्मय मांडलेकर तर जिजाऊंच्या भूमिकेत मृणाल कुलकर्णी हे कलाकार झळकणार आहेत.

चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी ए. ए . फिल्म्स सांभाळत आहे. नववर्षात म्हणजेच १६ फेब्रुवारी २०२४ ला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Municipal Election 2026 Results Live : मुंबईत ठाकरे बंधूंना अजूनही विश्वास; संजय राऊत म्हणाले, ''अद्यापही...''

Devendra Fadnavis Reaction : महापालिका निवडणुकांमधील ऐतिहासिक यशानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....

फरहान खानची मुख्य भूमिका असलेला 120 बहादूर आता पहा ओटीटीवर ! कधी आणि कुठे घ्या जाणून

WPL 2026 : डॅनी व्हॅटसह गुजरात जायंट्सच्या खेळाडू पोहोचल्या धारावीत; इंग्लंडची खेळाडू म्हणाली, येथील लोकं...

Pune Election Results: पती-पत्नीचा दणदणीत विजय; पुण्यातल्या 'या' प्रभागाची राज्यात होती चर्चा

SCROLL FOR NEXT