shivrayancha chhava marathi song Sinhasani Baisale Shambhu Raje song out now  SAKAL
मनोरंजन

Shivrayancha Chhava: कैलाश खेरच्या आवाजातलं छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचे भव्यदिव्य गीत..!

शिवरायांचा छावा सिनेमातील पहिलं गाणं भेटीला आलंय

Devendra Jadhav

Shivrayancha Chhava: गेल्या अनेक दिवसांपासून 'शिवरायांचा छावा' सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. या सिनेमातील पहिलं गाणं आज भेटीला आलंय. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित या सिनेमात छत्रपती संभाजी महाराजांची गाथा मोठ्या पडद्यावर बघायला मिळणार आहे.

अशातच 'शिवरायांचा छावा' मधील पहिलं गाणं रिलीज झालंय. संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकावर आधारीत भव्यदिव्य गाण्याला लोकांनी पसंती दिलीय.

संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकांचं गाणं

सूर्याच्या तप्त आभाळी, ही गरुडाची रे झेप, जाहला बघा संपूर्ण, नृप शंभूंचा अभिषेक अशा ओळी असलेलं हे गाणं भेटीला आलंय. या गाण्यात सिंहासनावर बसलेले शंभूराजे दिसत आहेत. त्यांच्यासमोर मावळमुलुखातील अनेक लोकं शंभूराजांचं गुणगान गाताना दिसत आहेत.

याच गाण्यात एक भावूक प्रसंग बघायला मिळतो. जेव्हा छत्रपती शंभूराजांना राज्याभिषेकाच्या वेळी शिवराय आणि जिजाऊ यांचा भास होतो.

हा अभिनेता साकारणार छत्रपती संभाजी महाराज

शिवरायांचा छावा सिनेमाचा टिजर रिलीज झालाय. या टिजरमध्ये घनदाट जंगलात हिंस्त्र वाघाचा सामना करणारा शिवरायांचा छावा अर्थात छत्रपती संभाजी महाराज दिसतात. त्यांचा हात जखमी दिसतो. संभाजी महाराज वाघाचा सामना करत त्याच्या शेपटीला धरुन त्याला ओढत आणतात.

अंगावर काटा आणणाऱ्या या टिजरमध्ये अभिनेता भूषण पाटील छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे.

या तारखेला येणार शिवरायांचा छावा भेटीला

'शिवरायांचा छावा' चित्रपटाच्या छायांकनाची जबाबदारी प्रियांका मयेकर यांनी सांभाळली आहे तर संकलन सागर शिंदे यांचे आहे. सिनेमात चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी हे कलाकार झळकणार आहेत.

चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी ए. ए . फिल्म्स सांभाळत आहे. नववर्षात म्हणजेच १६ फेब्रुवारी २०२४ ला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: एलपीजी गॅसला पर्याय सापडलेलं डायमिथाईल इथर नेमकं काय आहे? पुण्यातल्या शास्त्रज्ञांच्या हाती मोठं यश

CA Exam : टेलर व्यावसायिकाचा मुलगा झाला ‘सीए’; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन खांबाला बांधलं; लोकांनी सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट केले

Nasrapur Accident : भरधाव डंपरने दुचाकीला मागून ठोकरले; अपघातात आजोबा, नातीचा मृत्यू

Prakash Ambedkar : एपस्टिन प्रकरणाबाबत संघाला जाब विचारणार; २३ मार्चला नागपुरात आंदोलन

SCROLL FOR NEXT