

Ladki Bahin Yojana September Installment
ESakal
मुंबई : महाराष्ट्रातील महिला वर्गामध्ये अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सप्टेंबर महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. ऑक्टोबर महिन्याचा शेवटचा दिवस आला असून 'लाडकी बहीण योजनेतील' सप्टेंबर महिन्याचा हप्ता कधी येणार असा प्रश्न महिलांकडून विचारला जात होता. मात्र आता लाडक्या बहिणींच्या या प्रश्नाला पूर्णविराम मिळाला आहे.