Shivrayancha Chhava who played role of sambhaji maharaj digpal lanjekar chinmay mandlekar SAKAL
मनोरंजन

Shivrayancha Chhava: 'शिवरायांचा छावा' सिनेमाचं नवीन पोस्टर, कोण साकारणार छत्रपती संभाजी महाराज?

छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याची झलक समोर येतेय

Devendra Jadhav

Shivrayancha Chhava Movie Updates: दिग्पाल लांजेकरांनी मराठी सिनेसृष्टीला आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेला शिवराजअष्टकच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांचा सुवर्णकाळ पुन्हा अनुभवण्याची संधी दिली.

दिग्पाल लांजेकर यांच्या नव्या सिनेमातून पुन्हा एकदा ऐतिहासीक सिनेमाची पर्वणी रसिकांना मिळणार आहे. हा सिनेमा म्हणजे शिवरायांचा छावा.

'शिवरायांचा छावा' हा शिवराजअष्टकचा भाग नसला तरीही दिग्पाल लांजेकर यांच्या नवीन सिनेमाची खुप उत्सुकता आहे. तो म्हणजे शिवरायांचा छावा. या सिनेमाचं नवीन पोस्टर भेटीला आलंय.

'शिवरायांचा छावा'मध्ये कोण साकारणार छत्रपती संभाजी महाराज?

शिवरायांचा छावा सिनेमाची काही दिवसांपुर्वी घोषणा झाली. या सिनेमाच्या पहिल्या पोस्टरने लोकांची पसंती मिळवली. आता सिनेमाचं दुसरं पोस्टर रिलीज झालंय. यामध्ये छत्रपती संभाजी महाराज साकारणाऱ्या अभिनेत्याची झलक बघायला मिळतेय. मागे सिंह दिसत असून त्यासमोर रुद्रावतारात संभाजी महाराज बघायला मिळत आहेत. हे नवीन पोस्टर पाहताच एखादा नवखा अभिनेता शिवरायांचा छावा सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण करणार अशी दाट शक्यता निर्माण झालीय.

'शिवरायांचा छावा' चित्रपटाचं पहिलं लक्षवेधी पोस्टर

छत्रपती संभाजी महाराज म्हणजे असामान्य पराक्रमांचे अधिपतीच. इतिहासाच्या पानांवर सुवर्णाक्षरांत कोरलं गेलेलं स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचं अवघं आयुष्य एक धगधगतं अग्निकुंड म्हणावं लागेल.

मोठ्या पडद्यावर संभाजी महाराजांचा जीवनपट उलगडण्याचं शिवधनुष्य दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी उचललं आणि तेव्हापासून एकच चर्चा रंगली ती म्हणजे 'शिवरायांचा छावा' साकारणार कोण..?

या तेजस्वी, धाडसी, शस्त्रशास्त्र पारंगत शंभूराजांची भूमिका रुपेरी पडद्यावर साकारायची चालून आलेली सुवर्णसंधी कोणत्या कलाकाराला मिळणार हे लवकरच आपल्या समोर येणार आहे. त्यापुर्वी 'शिवरायांचा छावा' चित्रपटाच्या पहिल्या लक्षवेधी पोस्टरने प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची वाढली होती.

या तारखेला येणार शिवरायांचा छावा भेटीला

'शिवरायांचा छावा' चित्रपटाच्या छायांकनाची जबाबदारी प्रियांका मयेकर यांनी सांभाळली आहे तर संकलन सागर शिंदे यांचे आहे. सिनेमात चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी हे कलाकार झळकणार आहेत.

चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी ए. ए . फिल्म्स सांभाळत आहे. नववर्षात म्हणजेच १६ फेब्रुवारी २०२४ ला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs PAK W: भारतीय रणरागिणींनीही पाकिस्तानला दाखवला इंगा, वर्ल्ड कप सामन्यात चारली पराभवाची धूळ

World Cup 2025: भारताने पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर हस्तांदोलन केलं की नाही? सामन्यानंतर काय घडलं जाणून घ्या

IND A vs AUS A: प्रभसिमरनचं वादळी शतक, तर श्रेयस अय्यर-रियान परागचीही फिफ्टी! भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध जिंकली ODI सिरीज

Coldrif Cough Syrup च्या दूषित बॅचवर बंदी! महाराष्ट्र एफडीएचा अलर्ट जारी, तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक आणि ईमेल जाहीर

Crime: पक्षातील सदस्याला अडकवण्यासाठी घरात स्फोटके आणि दारू ठेवली, पण काँग्रेस नेता स्वत:च अडकला अन्...; काय घडलं?

SCROLL FOR NEXT