Shoaib Ibrahim and Dipika Kakar Sakal
मनोरंजन

Dipika Kakar Pregnancy: 'या' कारणाने लपवली दीपिकाने प्रेग्नन्सी...नवऱ्याने केला खुलासा

दीपिका ककर आणि शोएब इब्राहिम लग्नाच्या चार वर्षानंतर पालक होणार आहेत.

सकाळ डिजिटल टीम

दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम यांच्या घरी एक छोटा पाहुणा येणार आहे. प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर अखेर या जोडप्याने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. दीपिका कक्कर गरोदर आहे असे अनेक दिवसांपासून चाहत्यांना वाटत होते. मात्र दीपिका-शोएबने यावर काहीही न बोलण्याचा निर्णय घेतला. हे करण्यामागे एक मोठे कारण होते. ज्याचा खुलासा त्यांनी आता केला आहे.

दीपिका ककर आणि शोएब इब्राहिम लग्नाच्या चार वर्षानंतर पालक होणार आहेत. कलाकार असण्यासोबतच दोघे व्लॉगर्स देखील आहेत. दीपिका-शोएब अनेकदा यूट्यूब व्हिडिओंमध्ये मनातल्या गोष्टी चाहत्यांशी शेअर करतात. तो क्षणही आला जेव्हा शोएब दीपिकाने त्यांच्या प्रियजनांना गरोदरपणाची गोड बातमी सांगितली. प्रेग्नेंसीच्या घोषणेसोबतच शोएबने एक YouTube व्लॉग शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्याने सांगितले की, दीपिका कक्कर तीन महिन्यांची गर्भवती आहे. आनंदाच्या निमित्ताने या जोडप्याने सर्व हितचिंतकांचे आभार मानले आहेत.

चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर करताना शोएब म्हणतो, गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही व्हिडिओ बनवू शकत नाही. याची काही कारणे होती. पण हो, आता आम्हाला कळवण्यात आनंद होत आहे की दीपिका आणि मी पालक होणार आहोत. हा आमच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण आहे. अनेक भावना आहेत. तो पुढे म्हणाला की, ही बातमी आम्ही तुम्हाला आधी सांगितली नाही. कारण घरच्यांनी आणि डॉक्टरांनी सांगण्यास मनाई केली होती. तीन महिने पूर्ण होईपर्यंत कोणालाही सांगू नका असे सांगितले.

व्हिडिओमध्ये दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिमने एक धक्कादायक गोष्ट शेअर केली आहे. शोएब सांगतो, गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये दीपिकाचा गर्भपात झाला होता. दीपिका 4 ते 6 आठवड्यांची गरोदर होती. पण तिचा गर्भपात झाला. यानंतर दीपिकाला खूप वाईट वाटत होते. शोएबची आईही खूप नाराज होती. दीपिकाला या दुःखातून बाहेर यायला खूप वेळ लागला. गर्भपातानंतर दीपिका मानसिक आणि शारीरिक अशा दोन्ही समस्यांमधून गेली. पण ते म्हणतात की दु:खानंतर सुखाची वेळ येते. शोएब आणि दीपिकाच्या आयुष्यात आनंद आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission : कर्मचारी अन् पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी; आठव्या वेतन आयोगात नेमकं काय ठरणार?, चर्चा निर्णायक टप्प्यात

Nagpur Cyber Fraud: डिलिव्हरी बॉयच्या मुखवट्याआड उभारले ठकबाजांचे साम्राज्य; महिला अटकेत, तिघे फरार; ‘म्युल’ खात्यांच्या रॅकेटचा पर्दाफाश

Sangli Road Accident : ड्यूटी संपली, भूक लागल्याने नाश्ता शोधायला निघाले अन्...; सांगलीत उड्डाणपुलावर भीषण अपघात, कारच्या धडकेत 24 वर्षीय डॉक्टर तरुणीचा दुर्दैवी अंत

Koyna Dam: नवजाला ९१ मिमी पाऊस! कोयना धरणातील पाणीसाठा ९२.७० टीएमसीवर, महाबळेश्वरला उघडीप तर कोयनानगरला पाऊस सुरूच

Sadabhau Khot: 'देशात जगणं स्वस्त, मरणं महाग झालंय': सदाभाऊ खोत, फुकट धान्य आणि अनुदान थांबवा

SCROLL FOR NEXT