Shoaib Malik Third Wife Sana Javed Pakistani Actress  esakal
मनोरंजन

Sana Javed Controversy : शोएबला आवडली पण 'पाक इंडस्ट्री' ला झाली नकोशी! काय आहे 'सना' ची स्टोरी?

शेवटी पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक आणि भारतीय टेनिस खेळाडू सानिया (Sania Mirza Latest News) मिर्झा यांच्यातील घटस्फोटाच्या बातम्या या खऱ्याच होत्या हे आता दिसून आले.

युगंधर ताजणे

Shoaib Malik Third Wife Sana Javed Pakistani Actress : शेवटी पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक आणि भारतीय टेनिस खेळाडू सानिया (Sania Mirza Latest News) मिर्झा यांच्यातील घटस्फोटाच्या बातम्या या खऱ्याच होत्या हे आता दिसून आले. या दोन्ही सेलिब्रेटींचा घटस्फोट झाला अन् आता शोएबनं तिसरं लग्नही केलं. त्याची तिसरी पत्नी सनाही (Sana Javed News) पाकिस्तान मनोरंजन विश्वातील मोठी सेलिब्रेटी आहे.

सना जावेद ही पाकिस्तान चित्रपट आणि मालिका विश्वातील मोठी (Shoaid Akhtar Wedding) अभिनेत्री आहे. मात्र तिचा जेवढा चाहतावर्ग आहे तितकाच तिच्यावर टीका करणाऱ्यांची संख्याही मोठी असल्याचे दिसून आले आहे. यापूर्वी सना जावेद वेगवेगळ्या कारणांमुळे ट्रोल झाली होती. ती (Sania Mirza Divorce News) तिच्या बिनधास्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहणारी सेलिब्रेटी आहे. त्यामुळे तिच्याभोवती वाद असतोच असे काही जणांचे म्हणणे आहे.

शोएबनं त्याच्या सोशल मीडियावर सनासोबतच्या लग्नाचे फोटो शेयर केले आहेत. त्यावर त्याला चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. काही नेटकऱ्यांनी त्याच्यावर सडकून टीकाही केली आहे. पूर्वी सानिया आणि शोएबच्या घटस्फोटाच्या बातम्यांना उधाण आले होते. त्या बातम्या पहिल्यांदा अफवा असल्याचे सांगण्यात आले होते. शोएब आणि सानियामध्ये दुरावा वाढतो आहे यावरुन त्या सेलिब्रेटींनी देखील त्यावर बोलणे टाळले होते.

मात्र आता सना जावेद सोबतच्या लग्नाचे फोटो समोर आल्यानंतर चाहत्यांना ती गोष्ट अफवा नसून संसाराला घरघर लागल्याची बातमी खरी होती याची साक्ष पटली आहे. ३० वर्षीय सनानं शोएब सोबत दुसरं लग्न केलं आहे. तिचं पहिलं लग्न गायक उमेर जस्वाल सोबत झालं होतं. तिच्या प्रोफेशनल विषयी सांगायचे झाल्यास तिचं सना मेरा पहला प्यार, मीनू की ससूराल, चिंगारी सारख्या मालिकांमध्ये तिनं काम केलं आहे.

टीव्ही मनोरंजन विश्वातील अनेक जणांशी सनानं पंगा घेतल्याचे बोलले जाते. त्यामुळे इंडस्ट्रीतील कित्येक जण तिला टाळण्याचा प्रयत्न करतात. सनानं काही महिन्यांपूर्वी प्रसिद्ध पाकिस्तानी मॉडेल मनाल सलीमला दो टके की मॉडेल असे म्हटले होते. त्यामुळे ती चर्चेत आली होती. त्यावरुन तिच्यावर नेटकऱ्यांनी आगपाखड केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! ३३ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार अतिवृष्टी, महापुराची नुकसान भरपाई; सर्व जिल्ह्यांचे पंचनामे अहवाल सादर

Prashant Kishor on Bihar Election: अखेर प्रशांत किशोर यांनी निवडणूक न लढवण्यामागचं नेमकं कारण सांगितलं, म्हणाले..

पोलिस आयुक्तांचा मोठा निर्णय! सोलापूर शहरात रात्री १२ ते पहाटे ५ पर्यंत नाकाबंदी; प्रत्येक पोलिस ठाण्याअंतर्गत एक विशेष पथक

Baidpura Violence : गोमांस विक्रीच्या संशयावरून दोन गट आमनेसामने; दोन्ही गटाकडून तक्रारी, अदखलप्राप्त गुन्हे दाखल

Pune Traffic : पुणे-सातारा बाह्यवळण मार्गावर दिवाळीच्या गर्दीत वाहतूक कोंडीचा कहर

SCROLL FOR NEXT