Shocking! Ajay Devgan injured during the shooting of Singham Again SALAL
मनोरंजन

Ajay Devgn Singham Again: धक्कादायक! अजय देवगण 'सिंघम अगेन'च्या शूटींगदरम्यान जखमी, काय घडलं नेमकं?

सिंघम अगेनच्या शुटींगदरम्यान अजय देवगण जखमी झाल्याची धक्कादायक बातमी समोर येतेय

Devendra Jadhav

Ajay Devgn Injured News: अजय देवगणच्या 'सिंघम अगेन' सिनेमाची उत्सुकता आहे. सिंघम अगेनच्या माध्यमातुन अजय पुन्हा एकदा बाजीराव सिंघमच्या भुमिकेतुन पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सिंघम अगेम मध्ये तगडी स्टारकास्ट आहे. अशातच सिंघम अगेनच्या सेटवरुन मोठी बातमी समोर येतेय. सिंघम अगेनच्या शुटींगदरम्यान दुखापत झाल्याने अजय देवगण जखमी झालाय.

शुटिंग दरम्यान दुखापत

दिग्दर्शक रोहित शेट्टी आणि त्याची टीम विलेपार्ले येथे सिंघम अगेन या चित्रपटाचे शूटिंग करत होती. एका अॅक्शन सीनच्या चित्रीकरणादरम्यान अभिनेत्याच्या डोळ्याला दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अजय देवगण एका कॉम्बॅट सीनचे शूटिंग करत होता. त्यावेळी चुकून अजयच्या चेहऱ्यावर आघात झाला, त्यामुळे त्याच्या डोळ्याला दुखापत झाली.

ब्रेकनंतर शूटिंग पुन्हा सुरू झाले

अमर उजालाने दिलेल्या वृत्तानुसार, जखमी झाल्यानंतर अजयने काही तासांसाठी विश्रांती घेतली आणि या काळात डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केले. या ब्रेकदरम्यान रोहितने खलनायकांचे इतर सीन शूट केले.

एक कौतुकाची गोष्ट म्हणजे, दुखापत होऊनही अजयने आपल्या कामावर परिणाम होऊ दिला नाही. थोडी विश्रांती घेऊन अजयने काही वेळाने शुटिंगला पुन्हा सुरूवात केली.

सिंघम अगेनमध्ये नवीन कलाकार सहभागी

रोहीत शेट्टीच्या सिंघम अगेन या भन्नाट कॉप युनिव्हर्समध्ये यावेळी दीपिका पादुकोण, टायगर श्रॉफ हे सुपरस्टार कलाकार सुद्धा सामील झाले आहेत. याशिवाय अभिनेत्री करिना कपूर सुद्धा सिंघम अगेनमध्ये झळकणार आहे. याशिवाय अक्षय कुमार आणि रणवीर सिंग सुद्धा झळकणार आहेत.

अशाप्रकारे सिंघम अगेनमध्ये या सर्व लोकप्रिय कलाकारांना एकत्र पाहणं एक पर्वणी असणार यात शंका नाही. सिंघम अगेन पुढील वर्षी २०२४ ला सिनेमागृहांमध्ये झळकणार आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT