irrfan khan 
मनोरंजन

इरफान खानला संगीतकार सौमिक दत्तांची 'पीकू' थीममधून म्युझिकल श्रद्धांजली, बिग बी झाले भावूक..

सकाळ वृत्तसेवा

मुंबई :  बॉलिवूड अभिनेता इरफान खान यांच्या निधानाने बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. चाहत्यांना त्यांच्या निधनाचा मोठा धक्का बसला आहे. कॅन्सरवर मात करत भारतात परतल्यानंतर इरफान खानने पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये 'अंग्रेजी मिडियम' चित्रपटातून दमदार पुनरागम केले. इरफानने जगाचा निरोप घेतला तरी देखील त्याच्या चित्रपटांमधून, अभिनयामधून तो आजही प्रेक्षकांच्या मनात आहे.  अगदी कमी वयात इरफान खानने जगाचा निरोप घेतला. इरफान खानला सोशल मिडियावर बऱ्याच सेलिब्रेटींनी आणि चाहत्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. अशातच एका संगीतकाराने वेगळ्या अंदाजात इरफान खानला श्रद्धांजली वाहिली आहे.

संगीतकार सौमिक दत्ताने इरफानला म्युझिकल श्रद्धांजली दिली आहे. त्याने इरफानच्या 'पिकू' चित्रपटाचे थिम सॉंग सरोद या वाद्यावर वाजवले आहे. त्याचा हा व्हिडिओ दिग्दर्शक शुजित सिरकारने त्यांच्या ट्विटर अकाऊँटवर शेअर केला आहे.

याशिवाय बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन या श्रद्धांजलीवर भाऊक झाले आहेत. या व्हिडिओमध्ये सौमिक देखील ही वाद्य वाजवताना भाऊक झालेला दिसून आला. बिग बींनी या व्हिडिओला रिट्विट केले आहे. यावर ते म्हणाले की, 'इरफानला या म्युझिक पिसपेक्षा उत्तम श्रद्धांजली असूच शकत नाही.'

दिग्दर्शक शूजित सिरकारने 2015 साली 'पिकू' चित्रपट बनवला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. या चित्रपटात इरफान खानसोबत अमिताभ बच्चन आणि दिपीका पादुकोण मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटापासूनच इरफान खान, शूजित सिरकार आणि बिग बी यांचे फार जवळचे संबंध निर्माण झाले होते.

शूजित इरफानचा फारच जवळचा मित्र होता. आणि म्हणूनच इरफानच्या निधनाची बातमी सर्वात आधी शूजितने दिली होती.  

shoojit sircars musical tribute to late irrfan khan what amitabh bachchan has said will make you emotional  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News: नावडत्या भेंडीच्या भाजीवरून घर सोडले; आईशी घातला वाद; १७ वर्षीय मुलाने ट्रेनने गाठली दिल्ली

ENG vs IND,3rd Test: बुमराहने कॅच घेतला अन् सिराजने इंग्लंडच्या सलामीवीराच्या समोर जाऊन केलं आक्रमक सेलिब्रेशन; Video

Nagpur News: मान हॉटेलमधील कुंटणखान्यावर छापा; जबलपूर महामार्गावरील घटना, पीडितेची सुटका, ६० हजारांचा ऐवज जप्त

Latest Marathi News Updates :दोन गट हातात कोयता घेऊन आमनेसामने; पोलिसांच्या तत्परतेने अनर्थ टळला

Nagpur News : ऑनलाइन बेटिंग रॅकेटचा पर्दाफाश; २० कोटींचे व्यवहा, छत्तीसगढ पोलिसांकडून नागपुरात सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT