बिग बॉस मराठी ३ मध्ये Bigg Boss Marathi 3 सहभागी झाल्यापासून अभिनेत्री स्नेहा वाघ Sneha Wagh खूप चर्चेत आहे. स्नेहाच्या स्वभावाने आणि घरातील इतर सदस्यांसोबतच्या तिच्या वागण्याने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. स्नेहाचा पूर्वाश्रमीचा पती आविष्कार दारव्हेकरसुद्धा बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून सहभागी झाला आहे. वयाच्या १९व्या वर्षी स्नेहाने आविष्कारशी लग्न केलं होतं. मात्र या दोघांचा संसार फार काळ टिकला नाही. आविष्कारवर कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप करत स्नेहाने त्याला घटस्फोट दिला. त्यानंतर स्नेहाने इंटेरिअर डिझाइनर अनुराग सोलंकीशी Anurag Solanki २०१५ मध्ये लग्न केलं. स्नेहाचं दुसरं लग्नसुद्धा फार काळ टिकलं नाही. स्नेहाने बिग बॉसच्या घरात येण्यापूर्वी अनुरागवर छळ केल्याचा आरोप केला. आता अनुरागने स्नेहाला खुलं आव्हान दिलं आहे. मी तुझा छळ केल्याचा पुरावा मला दाखव, असं त्याने स्नेहाला विचारलं आहे.
अभिनेत्री काम्या पंजाबीने अनुरागची बाजू घेत स्नेहाला फटकारलं होतं. दुसऱ्या लग्नाबाबत खोटं बोलू नकोस, असं ती स्नेहाला म्हणाली होती. काम्याचे आभार मानत अनुरागने सोशल मीडियावर लिहिलं, 'धन्यवाद काम्या, एका गेम शोसाठी लोकं इतक्या खालच्या पातळीला जाऊ शकतात हे पाहून मला धक्का बसतोय. मला याबद्दल फार काही बोलायचे नाहीये पण माझी एकच विनंती आहे की, स्नेहा.. जेव्हा कधी तू बिग बॉसच्या घरातून बाहेर येशील, तेव्हा मी तुझा छळ केल्याचा पुरावा मला आणि जगाला नक्की दाखव. ता. क.- मी तिचा दुसरा पती होतो.'
काम्या पंजाबीने फटकारलं
स्नेहाची जुनी मुलाखत शेअर करत काम्याने ट्विट केलं, 'तुला बिग बॉसच्या घरात यायचं होतं, हे ठीक आहे. पण त्यासाठी व्हिक्टिम कार्ड का वापरायचं? तुझ्या पहिल्या लग्नाविषयी माहित नाही पण फक्त खेळासाठी तुझ्या दुसऱ्या लग्नाबद्दल खोट्या गोष्टी पसरवू नकोस. सत्य काय आहे ते मी सर्वांसमोर आणू शकते.' काम्याच्या या ट्विटनंतर स्नेहाच्या चाहत्यांनी तिच्यावर टीका करण्यास सुरुवात केली. टीकाकारांना उत्तर देत काम्या पुढे म्हणाली, 'या देशात जेव्हा एखादी महिला ही अबला बनून काही सांगत असेल तर तिच्यावर सगळेच विश्वास ठेवतात. सत्य घटना माहित नसताना पुरुषाला चुकीचं समजलं जातं. पण या प्रकरणात मला सत्य माहित आहे. कारण त्या व्यक्तीला मी खूप चांगल्या प्रकारे ओळखते.'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.