Shraddha Kapoor latest news esakal
मनोरंजन

Shraddha Kapoor : श्रद्धाचा रुमर्ड बॉयफ्रेंड 'राहुल मोडी' आहे तरी कोण?

गेल्या काही दिवसांपासून श्रद्धा कपूर आणि राहुल यांना एकत्रित स्पॉट केले गेले आहे. त्यावरुन वेगवेगळ्यांना चर्चांना उधाण आले आहे.

युगंधर ताजणे

Shraddha Kapoor Actress Alleged boyfriend rahul mody : श्रद्धा आणि राहुल हे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सुरु आहेत. तो राहुल आहे तरी कोण, त्याची आणि श्रद्धाची ओळख झाली तरी कशी, तो देखील बॉलीवूडशी संबंधित आहे का, अशा प्रकारचे प्रश्न नेटकऱ्यांनी दोन्ही सेलिब्रेटींबाबत उपस्थित केले आहेत.

बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून श्रद्धा कपूरचे नाव घेतले जाते. (rumor floating Shraddha and Rahul) इंस्टावर सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱ्या सेलिब्रेटींच्या यादीत श्रद्धाचं नाव घेतलं जातं. यात आता ती तिच्या रुमर्ड बॉयफ्रेंड राहुल मोडीच्या नावामुळे लाईमलाईटमध्ये आली आहे. त्या दोघांना मुंबई विमानतळावर स्पॉट करण्यात आले. तो फोटो समोर आल्यानंतर दोघांविषयी चर्चेला उधाण आले होते.

सध्या तरी या दोन्ही सेलिब्रेटींच्या बाबत नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या गॉसिपिंगला सुरुवात केली आहे. त्यांना वेगवेगळ्या समारंभामध्ये देखील स्पॉट केले गेले होते. तेव्हापासून श्रद्धा आणि राहुलच्या नावाची चर्चा सुरु झाली. राहुलनं लव रंजनच्या प्यार का पंचनामा नावाच्या फिल्मचे लेखन केले होते. त्यानंतर त्यानं सोनु की टिटू की स्विटीचे लेखनही राहुलनं केले होते. तू झुठी मैं मक्कार नावाच्या सेटवर श्रद्धा आणि राहुलची ओळख झाली होती. त्यानंतर त्यांच्यातील मैत्री वाढत गेल्याची चर्चा आहे. इंडिया टीव्हीनं याबाबत एक वृत्त दिलं आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २०२२ मध्ये श्रद्धाचा तिचा बॉयफ्रेंड फोटोग्राफर रोशन श्रेष्ठ याच्यासोबत ब्रेक अप झाल्याच्या बातम्यांना उधाण आले होते. राहुलविषयी बोलायचं झाल्यास त्याचा जन्म मुंबईतला असून त्यानं विसलिंग वूडसमध्ये शिक्षण घेतले आहे. त्यानंतर त्यानं २०११ मध्ये प्यार का पंचनामाच्या चित्रिकरणात महत्वाची भूमिका बजावली होती. त्याचे वडील आमोद हे मोठे उद्योगपती असून बऱ्याच दिवसांपासून श्रद्धा आणि राहुल हे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

या सगळ्यात श्रद्धा आणि राहुलनं त्यांच्या नात्याविषयी अधिकृतरित्या कोणत्याही प्रकारचा खुलासा केलेला नाही. मात्र सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटो आणि व्हिडिओमुळे त्यांच्यातील नात्याविषयी चाहत्यांनी, नेटकऱ्यांनी वेगवेगळे तर्क लावण्यास सुरुवात केली आहे.

श्रद्धाच्या प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास ती शेवटी तू झुठी में मक्कर नावाच्या चित्रपटामध्ये काम केले होते.त्यात तिच्या जोडीला रणबीर कपूर प्रमुख भूमिकेत होता. या प्रोजेक्टच्या निमित्तानं रणबीर आणि श्रद्धा पहिल्यांदाच एकत्र दिसले आहेत. यानंतर ती स्त्री २ मध्ये दिसणार आहे. २०१८ मध्ये आलेल्या स्त्री नावाच्या चित्रपटाचा सिक्वेन्स हा चित्रपट असणार आहे. यानंतर ती आणखी वेगळ्या ऐतिसासिक चित्रपटाचा भाग असणार असल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray and Uddhav Thackeray: राज-उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र मैदानात; ४ ऑक्टोबरला मुंबईत मोर्चा, हातात फक्त तिरंगा!

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर ट्रॅफिक जाम! टेम्पो पलटी झाल्याने वाहनांच्या रांगाच रांगा, 4-5 तासांपासून भीषण कोंडी

Revanth Reddy Remarks : ‘महादेव गरिबांचे, राम श्रीमंतांचे’ रेवंत रेड्डींच्या वक्तव्याने राजकीय वातावरण तापले; भाजप आक्रमक

Marathi News Live Updates: अंगारकी चतुर्थीनिमित्त मोरगावच्या मयुरेश्वराच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची मोठी गर्दी, मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण

World Heart Day 2026: कार्डिओफोबिया म्हणजे काय? लक्षणे, कारणे आणि उपचार याबद्दल संपूर्ण माहिती एकाच क्लिकवर!

SCROLL FOR NEXT