Shraddha Kapoor  Sakal
मनोरंजन

Shraddha Kapoor: प्रमोशनसाठी श्रद्धानं कसली कंबर! 'तू झुठी मैं मक्कार'च्या गाण्यावर एअरपोर्टवर केला भन्नाट डान्स

अभिनेत्री श्रद्धा कपूरने तिचा आगामी चित्रपट 'तू झुठी मैं मक्कार'च्या गाण्यावर विमानतळावर चाहत्यासोबत डान्स केला. श्रद्धाची ही स्टाईल चाहत्यांना खूप आवडत आहे.

सकाळ डिजिटल टीम

एअरपोर्टवरून बाहेर पडताच श्रद्धा कपूरने फॅनसोबत डान्स करायला सुरुवात केली. श्रद्धा कपूरला असा डान्स करताना पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले. खरंतर श्रद्धा कपूर तिच्या आगामी 'तू झूठी मैं मक्कार' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

ती मुंबई विमानतळावर पोहोचताच तिला पाहून एका चाहत्याने तिच्याच चित्रपटातील 'शो मी द ठुमका' गाण्याची हुक स्टेप करायला सुरुवात केली. श्रद्धा कपूरनेही चाहत्यासोबत डान्स केला.

श्रद्धा कपूरने राउंड नेकचा पिवळा टॉप आणि लूज फिट पॅन्ट घातली आहे. सनग्लासेस लावून अभिनेत्रीने तिच्या चाहत्यासोबत जोरदार डान्स केला. श्रद्धाची ही स्टाईल चाहत्यांना खूप आवडत आहे. श्रद्धाने तिच्या फॅनला हाय-फाय दिला आणि ‘क्या बात है’ म्हणत त्याचे कौतुक केले.

काल श्रद्धा कपूरने तिचा वाढदिवस तिच्या चाहत्यांसोबत साजरा केला. आपल्या कारचे सनरूफ उघडून सर्वांना भेटत होती आणि फोटो क्लिक करत होती. सोशल मीडियावर श्रद्धाचे अनेक व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत आहेत.

मात्र, यावेळी एका चाहत्याने फोटो क्लिक करण्यासाठी आपल्या मुलाला गाडीवर ठेवले, यामुळे श्रद्धा चांगलीच अस्वस्थ झाली होती.

श्रद्धा कपूरचा चित्रपट 'तू झुठी मैं मक्कार' 8 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात पहिल्यांदाच श्रद्धा कपूर आणि रणबीर कपूर ही जोडी पडद्यावर दिसणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे तिसरे गाणे 'शो मी द ठुमका' रिलीज झाले आहे.

हे गाणे सुनिधी चौहान आणि शाश्वत सिंग यांनी गायले आहे. नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्य यांनी यामध्ये अनेक नवीन डान्स मूव्ह्स जोडल्या आहेत. हे गाणे होळीच्या दिवशी हिट होऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Updates: राज्यासह देशात आज कुठे काय घडलं? जाणून घ्या...

INDIA VS PAKISTAN : तारीख नोट करून घ्या! सप्टेंबरमध्ये भारत-पाकिस्तान समोरासमोर... क्रिकेटचा हा महामुकाबला कुठे होणार?

Liquor Flavour Row: फ्लेवर वाद चिघळला! FSSAI च्या नोटिसांना दारू कंपन्यांचे हायकोर्टात आव्हान; नियमांवरून नवा संघर्ष

Dilip Gavit: सुवर्णपदक विजेत्या खेळाडूला अडीच तास ताटकळत ठेवलं! दिलीप गावित यांचा राज ठाकरेंवर संताप

Karamad-Ladsawangi Accident : करमाड–लाडसावंगी रस्त्यावरील खड्ड्यांचा तिसरा बळी; भरधाव टेम्पोच्या धडकेत ७९ वर्षीय वृद्धेचा मृत्यू, चालक फरार

SCROLL FOR NEXT