shraddha kapoor meets her ailing little fan in hospital
shraddha kapoor meets her ailing little fan in hospital  
मनोरंजन

बुरखा घालून श्रध्दाने केली चाहतीची इच्छा पूर्ण

सकाळवृत्तसेवा

अभिनेत्री श्रध्दा कपूर हिने आपल्या एका खास चाहतीला भेट देऊन सरप्राइज दिले आहे. रुग्णालयातील भेटीचा फोटो इन्स्टाग्राम अकाउंटवर श्रध्दाने शेअर केला आहे.

साम्या ही 13 वर्षीय मुलगी मुंबईतील रुग्णालयात क्षयरोगाशीलढते आहे. श्रध्दा ही साम्याची आवडती अभिनेत्री आहे. तिने श्रध्दाला भेटण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा केटो या संस्थेनेश्रध्दा आणि साम्या ची भेट घडवून आणली. केटो संस्था ही क्राउंड फंडीगमधून समाजकार्यासाठी पैसे उभे करते. 

केटोने श्रध्दाला संपर्क साधून साम्याबद्दल सांगितल्यानंतर व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत साम्यासा भेटण्यासाठी श्रध्दा रुग्णालयात पोहोचली. रुग्णालय प्रशासनाला सुरक्षेसंबंधी त्रास होऊ नये म्हणून श्रध्दाने ओळख लपविण्यासाठी बुरखा परिधान केला होता. साम्या सोबतचा फोटो शेअर करत श्रध्दा म्हणते, 'मला खूप आनंद आहे की मला साम्याला भेटता आले. ती लहानशी परी खूप खास आहे. ती बरे होण्यासाठी मी प्रार्थना करते. केटोने तिच्या उपचारात मी कशी मदत करु शकेन हे मला कळवत राहावे आणि केटोला माझ्याकडून ते करत असलेल्या कामाला शुभेच्छा.'

श्रध्दा सध्या 'साहो' या चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. तिच्यासोबत अभिनेता प्रभास मुख्य भूमिकेत आहे.
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satwiksairaj Rankireddy Chirag Shetty : सात्विक - चिराग जोडीनं थायलंड ओपनची गाठली फायनल

'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींनी लोकसभा निवडणूक का लढवली नाही? कारण आलं समोर

किर्झिगस्तानमध्ये हिंसाचार! स्थानिक लोकांकडून पाकिस्तानसह भारतीय विद्यार्थ्यांनाही लक्ष्य; परराष्ट्रमंत्र्यांनी घेतली दखल

Latest Marathi News Live Update : मुलुंड घटनेप्रकरणी आरोपींना एक दिवसाची कोठडी

SCROLL FOR NEXT