Shraddha Kapoor Singing Video: Esakal
मनोरंजन

Shraddha Kapoor: 'आओ हुजूर तुम को' श्रद्धा कपूरनं गायिले आजी आशा भोसले यांचे गाणे! व्हिडिओ व्हायरल

Vaishali Patil

Shraddha Kapoor Singing Video: मुंबईतील सर्वात मोठ्या मॉल जिओ वर्ल्ड प्लाझाचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. काल रात्री अंबानी कुटुंबाने जिओ वर्ल्ड प्लाझाचे उद्घाटनासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

या कार्यक्रमात बॉलिवूड सेलेब्सने गर्दी केली होती. यावेळी बॉलिवूड कलाकार आणि अभिनेत्रींनी रॅम्पवर आपली जादू दाखवली. कलाकारांनी आपल्या ग्लॅमरस आउटफिट्समध्ये कार्यक्रमाला हजेरी लावली.

सध्या या कार्यक्रमाचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. यातच बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर हिचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे ज्यात श्रद्धा आपल्या आवाजाची जादू पसरवताना दिसत आहे.

श्रद्धा कपूर बॉलिवूडमधील सर्वात सुंदर आणि प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक आहे. ती केवळ तिच्या अभिनयासाठीच नाही तर तिच्या मधुर आवाजासाठीही ओळखली जाते.

अलीकडेच श्रद्धाने आशा भोसले यांचे 'आओ हुजूर तुम को' हे गायिले. 1961 च्या किस्मत या क्लासिक चित्रपटातील आशा भोसले यांचे 'आओ हुजूर तुमको' हे गाणं श्रद्धानं उत्तमरित्या गायलं.

यावेळी तिच्या आवाजाबरोबरच तिच्या लूकनेही सर्वांची मनं जिंकली. यावेळी तिने सुंदर लाल साडी घातली होती सोबतच सोन्याचे नक्षीकाम असलेले काळे ब्लाउज घातले होते. कुरळे केस आणि लाल लिपस्टिकसह तिने लूक पूर्ण केला. या अवतारात श्रद्धा कपूर खूपच सुंदर दिसत आहे.

श्रद्धा कपूरनं 'एक व्हिलन' या चित्रपटातील 'गलिया' गाण्यातून तिचा संगीतमय प्रवास सुरू केला. त्यानंतर तिने बागी चित्रपटातील 'सब तेरा' हे गाण गायिलं होतं.

यासोबतच तिने 'तेरे मेरे दिल' आणि 'चल उद जा रे' सारख्या गाणी गायिली त्याचबरोबर तिने 'हाफ गर्लफ्रेंड'मधील 'फिर भी तुमको चाहूंगा' हे गाणेही आपल्या आवाजात गायिले आहे.

श्रध्दा कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर 'स्त्री 2' मध्ये राजकुमार राव सोबत पुन्हा साकारण्यासाठी सज्ज आहे. यासोबतच श्रध्दा कार्तिक आर्यनसोबत आगामी चित्रपटासाठी काम करत असल्याची चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT