shraddha kapoor talk in marathi with pap cute video viral SAKAL
मनोरंजन

Shraddha Kapoor: "अरे थांब येते मी!" श्रद्धा कपूरचा पापाराझींशी मराठीत संवाद, व्हिडीओ व्हायरल

श्रद्धा कपूरने तिला भेटायला आलेल्या पापाराझींशी खास मराठीत संवाद साधलाय

Devendra Jadhav

Shraddha Kapoor Video: श्रद्धा कपूर ही मनोरंजन विश्वातील चर्चेतील अभिनेत्री. श्रद्धाने आजवर अनेक सिनेमांमधून प्रेक्षकांचं प्रेम मिळवलंय. आशिकी 2 असो किंंवा काही महिन्यांपुर्वी रिलीज झालेला तू झूठी में मक्कार सिनेमा असो. श्रद्धाने कायमच सुंदर अभिनय केलाय.

श्रद्धाचं मराठी कनेक्शन सर्वांना माहितच आहे. अशातच श्रद्धाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडीओत श्रद्धा पापाराझींशी मराठीत बोलताना दिसतेय.

(shraddha kapoor talk in marathi with pap cute video viral)

श्रद्धाचा पापाराझींशी मराठीत संवाद

श्रद्धाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. यात श्रद्धा शूटींगच्या ठिकाणी पाहायला मिळतेय. तिला शूट करायला पापाराझी आलेले असतात. अशातच एका फोटोग्राफरचा पाय वायरमध्ये अडकतो आणि त्याचा तोल जातो. श्रद्धा त्याला म्हणते, "अरे सांभाळून प्लीज"

पुढे पापाराझी श्रद्धाचा पाठलाग करतात. तेव्हा श्रद्धा व्हॅनिटीमध्ये जाण्याआधी त्यांना म्हणते, "अरे थांबा. येते ना मी"

श्रद्धाचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय.

फॅनने विचारलं लग्न कधी करतेस, त्यावर श्रद्धा म्हणाली

श्रद्धा सोशल मीडियावर तिच्या फॅन्स आणि फॉलोअर्ससोबत चर्चा करत असते. श्रद्धाच्या एका फोटोवर काही दिवसांपुर्वी फॅनने कमेंट केली होती

खरंतर एका चाहत्याने श्रद्धाला तिच्या लग्नाच्या प्लॅनिंगबद्दल विचारलं होतं. चाहत्याने लिहिले, “तुझे लग्न कधी होणार?” यावर श्रद्धाने एक मजेदार उत्तर दिले आणि म्हणाली, “शेजारी राहणारी आंटी रियल आयडी वर येऊन माझ्याशी बोला.” श्रद्धाच्या या उत्तराने चाहत्यांनी तिच्या चाहत्यांनी तिचं कौतुक केलं.

श्रद्धा कपूरचे आगामी सिनेमे

श्रद्धा कपूर या वर्षी तू झूठी में मक्कार सिनेमातून भेटीला आली. हा सिनेमा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडला. आता श्रद्धा आगामी स्त्री 2, चंदामामा दूर के, चालबाज इन लंडन अशा सिनेमांमध्ये झळकणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर तोडगा निघाला! बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे; महायुती सरकारने मान्य केल्या प्रमुख मागण्या, वेतनवाढ आणि ग्रॅच्युइटीवर निर्णय

T20 WC, IND W vs SA W: भारताचे सेमीफायनलचे गणित मारिझान कापच्या 'वन वुमन शो'मुळे बिघडले! दक्षिण आफ्रिकने मँचेस्टरमध्ये दिली मात

Khadakwasla Rain Update: खडकवासला धरण परिसरात तासाभरात ३० मिमी पाऊस; पाणीसाठ्यात वाढ नाही, रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी

Sangli Crime Twist: वेदांत बंडगर खून प्रकरणाला नवे वळण; कुख्यात गुंड म्हमद्या नदाफ अटकेत, पोलिस कोठडीचे अधिकार राखून कारागृहात रवानगी

Paithan Road Crash : पैठण तालुक्यात भीषण अपघात; भरधाव पिकअपच्या धडकेत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, दोन बालकांची प्रकृती गंभीर

SCROLL FOR NEXT