Shraddha Kapoor Google
मनोरंजन

श्रद्धा कपूरला का आवडते नववारी साडी? गुढीपाडव्या निमित्तानं सांगितलं कारण

श्रद्धा कपूर खूप ट्रेडिशनल आहे हे सोशल मीडियावरील तिच्या पोस्टच्या माध्यमातून नेहमीच समोर आले आहे.

प्रणाली मोरे

श्रद्धा कपूर(Shraddha Kapoor) किती ट्रेडिशनल आहे हे सगळ्यांनाच माहित आहे. सोशल मीडियावर तिच्या अनेक पोस्ट्सच्या माध्यमातून याचा दाखला अनेकांना मिळालाच असेल. आज गुढीपाडव्याच्या(Gudhipadwa) निमित्तानं तिनं बॉम्बे टाईम्स या इंग्रजी वृत्तपत्रासाठी खास नववारी साडी नेसत गुढी उभारुन आजचा मराठमोळा सण साजरा करण्याचा आनंद उपभोगला आहे. पिवळ्या रंगाची काठपदरी साडी नेसलेली,पारंपरिक साज-शृंगार केलेली श्रद्धा टिपिकल महाराष्ट्रीयन मुलीसारखी दिसत आहे. ती सुंदर आहेच पण आज सणाच्या निमित्तानं तिनं केलेला तिचा फेव्हरेट पेहराव तिच्यावर भलताच शोभून दिसत आहे. मराठी नववर्षाचं स्वागत करताना आपल्याला खूप आनंद होतोय हे देखील यावेळी तिनं आवर्जुन सांगितलं. आता श्रद्धा जरी शक्ती कपूर यांची मुलगी असली,पंजाबी कुटुंबातला तिचा जन्म असला तरी आई शिवांगी कोल्हापुरेमुळं तिचं नातं महाराष्ट्रीयन कुटुंबाशी तिच्या जन्मापासूनच जोडलं गेलं आहे. मराठी सर्वच सण आपण लहानपणापासून साजरे करत आलोय असं श्रद्धानं या खास फोटोशूटच्या निमित्तानं सांगितलं. तिनं एका टिपिकल मराठी मुलीप्रमाणे नववारी साडी(Navvari Sari) आणि पारपंरिक केलेला साज सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

श्रद्धा कपूरला नववारी साडी खूप आवडते असं देखील ती म्हणालीय. तिनं पुढे सांगितलं,''आतापर्यंत केवळ दुसऱ्यांनी नेसलेली नववारी साडी पाहून मलाही ती नेसावीशी वाटायची पण कधी योग आला नव्हता. आज पहिल्यांदा मी नववारी साडी नेसत आहे,ते सुद्धा मराठी पारंपरिक नथ,चंद्रकोराची टिकली आणि हे सारं माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. नववारी साडीला मोठा इतिहास आहे. नववारी साडी म्हणजे सामर्थ्य आणि शक्तीचं प्रतिक आहे. आपल्या पूर्वीच्या लढवय्या शूर स्त्रियांनी नववारी नेसून युद्धात शत्रूला नमवलं आहे. स्वातंत्र्याचं देखील हे एक प्रतिक आहे''.

''गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठणं,घरी बनवलेली पुरणपोळी त्यावर तूप सोडून खाणं हा आपला प्रत्येक वर्षीचा दिनक्रम असतो असं श्रद्धानं आवर्जुन सांगितलं. हे नवीन वर्ष म्हणजे माझ्यासाठी नवी सुरुवात,नवा आनंद असं मी मानते. त्यात यंदाचा गुढीपाडवा स्पेशल आहे कारण गेली दोन वर्ष कोरोनामुळे आपण सारे त्रस्त होतो,सण साजरे करण्याचा उत्साह कुठेतरी कमी झाला होता,लोकांकडे काम नसल्यानं सगळीकडे दुःखाचं वातावरण होतं. पण या सगळ्यावर मात करीत आता पुन्हा आपण सकारात्मकतेकडे वाटचाल करीत आहोत आणि हे खूप सुखावह आहे असं श्रद्धा म्हणाली. या दिवशी मला माझ्या कुटुंबासोबत रहायला आवडतं. घर स्वच्छ ठेवणं,घरातल्या कामांना मदत करणं प्रामुख्यानं मी एन्जॉय करते''. श्रद्धा सध्या लव्हरंजन सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. मध्यंतरी तिच्या या सिनेमाच्या सेटवरुन रणबीर कपूरसोबतचा तिचा डान्सिंग सीक्वेन्स शूट करतानाचा फोटो लीक झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Municipal Corporation Election 2026 Voting LIVE Updates : 15 जानेवारी, काँग्रेस कायमचं घरी! धनंजय महाडिक यांची टीका

Voting Ink: निवडणुका घेण्याचा अर्थ काय? मतदानानंतर बोटावरची शाई लगेच पुसली गेली, मतदारांचा संताप

Nagpur News: ‘ओऽऽ काट’च्या घोषणांनी आकाश दणाणले; नागपूरकरांचा पतंगोत्सव साजरा, गाण्यांच्या तालावर तरुणाईचा जल्लोष!

Manchar News : भीमाशंकर मंदिर बंद ठेवल्याने भाविकांअभावी शुकशुकाटाने अर्थचक्र ठप्प; मंचर व राजगुरुनगर मार्गांवरील व्यावसायिकांना फटका

Warm or Cold Water: हिवाळ्यात त्वचा कोरडी पडते? सकाळी चेहरा धुण्यासाठी कोमट की थंड पाणी योग्य, वाचा लगेच

SCROLL FOR NEXT